Bauxite Transport Dainik Gomantak
गोवा

Bauxite Transport: वास्‍कोत आता बॉक्साईटचा मारा!

रस्‍ते माखले : रस्‍त्‍यांसह घरांमध्‍ये धुळीचे साम्राज्‍य

गोमन्तक डिजिटल टीम

Bauxite Transport वास्को येथील आयओसी जंक्शनपासून सडा मुरगाव राष्ट्रीय महामार्गावर बॉक्साईट सांडल्याने सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरले आहे.

ही धूळ लोकांच्या घरात घुसल्याने परिसर प्रदूषित झाला आहे. एमपीएकडून साफसफाई होत नसल्याने लोकांच्या घरांमध्‍ये कोळशाबरोबर आता बॉक्साईटचा मारा सुरू झाला आहे.

मुरगाव बंदरात 10 व 11 बर्थवर जहाजातून बॉक्साईट आले आहे. ते जहाजातून उतरवून ट्रकमध्ये लोड केल्यानंतर त्याची वाहतूक रस्तामार्गे कर्नाटकात केली जाते.

दरम्यान, वाढत्या प्रदूषणामुळे वास्कोत कोळसा व बॉक्साईट वाहतूक बंद करण्यात आल्याने 9 नंबर गेटमधून सदर वाहतूक न करता गेट क्र. 1 हार्बर येथून करण्यात येते. जेव्हा मुरगाव बंदरात हार्बर ब्रेक वॉटर धक्‍क्यावर पर्यटक जहाजांचे आगमन होत असते, तेव्हा वाहतूक गेट क्र. 1 मधून करण्‍यात येते.

लोकांच्‍या आरोग्‍याला मोठा धोका

ट्रकांमधून करण्यात येणाऱ्या बॉक्साईट वाहतुकीमुळे भररस्त्यावर त्‍याची भुकटी सांडत असल्याने येथील राष्ट्रीय महामार्ग कोळशाबरोबर बॉक्साईटमुळे लालेलाल झालेला दृष्‍टिपथास पडतो. या राष्ट्रीय महामार्गावर दिवसागणिक शेकडो वाहनांची वर्दळ असते.

तसेच पादचाऱ्यांची वर्दळ असते. राष्ट्रीय महामार्गावर टेकडीवर लोकवस्ती आहे. बॉक्साईट व कोळसा वाऱ्याच्या प्रवाहामुळे लोकांच्या घरात घुसतो व याचा त्रास सहन करावा लागतो. शिवाय वाहनचालकांनाही धुळीमुळे मन:स्‍ताप सहन करावा लागतोय.

परिणामी अपघाताबरोबर आजार बळावण्याचा धोकाही निर्माण झाला असून लोक भयभीत झालेले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Bike Stunt Video: काळजाचं पाणी करणारा थरारक स्टंट! पठ्ठ्याचा डोकं चक्रावणारा व्हिडिओ व्हायरल; जीवाची लावली बाजी

Shani Gochar 2026: शनिदेव देणार 5 राशींना श्रीमंतीचं वरदान! हाती लागणार कुबेराचा खजिना; करिअरला मिळणार नवा बूस्ट

Colvale Jail Employee Stress: अभद्र युतीमुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा गुदमरतोय जीव! सुधारगृह गुन्हेगारांचा अड्डा; मानसिक आरोग्य कक्ष व छळविरोधी समित्यांची तातडीची मागणी

Crime News: आधी विषारी कोल्ड्रिंक पाजले, मग गळा आवळून केला खून! 20 वर्षांच्या संसारानंतर बायकोनेच नवऱ्याचा काढला काटा; कारण ऐकून व्हाल अवाक

Jitesh Kamat Colvale Jai: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाची सद्यस्थिती पाहता, 'गुन्हेगारांना आलिशान सुविधा पुरवणारे हॉलिडे होम' - जितेश कामत

SCROLL FOR NEXT