Bashudev Bhandari Case Dainik Gomantak
गोवा

Bashudev Bhandari: मैत्रिणीसोबत गोव्यात आला, कार गेली नदीत! 1 वर्ष झाले तरी बेपत्ता; गुजरातचा 'बाशुदेव' नेमका गेला कुठे?

St Estevam River Drowning Incident: सध्या पोलिसांची गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करत आहे. लवकरच या प्रकरणी आरोपपत्र सादर केले जाईल असे पोलिसांचे म्हणणे आहे.

Sameer Panditrao

पणजी: सांतइस्तेव येथील फेरीबोट धक्क्यावरून वर्षभरापूर्वी कार पाण्यात पडल्यानंतर बेपत्ता झालेला बाशुदेव भंडारी हा गुजरातचा युवक अद्याप सापडलेला नाही. त्याचे पुढे काय झाले याचे उत्तर वर्षभरानंतरही दृष्टिपथात नाही.

सध्या पोलिसांची गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करत आहे. लवकरच या प्रकरणी आरोपपत्र सादर केले जाईल असे पोलिसांचे म्हणणे आहे. बाशुदेव हा आपल्या मैत्रिणीसोबतच्या मैत्रीचा तिसरा वर्धापनदिन साजरा करण्यासाठी गेल्या वर्षी २७ ऑगस्टला गोव्यात आला होता.

२८ रोजी पणजीतील कॅसिनोत त्यांनी पार्टीही केली होती. बाशुदेवच्या या पार्टीला हजर राहण्यासाठी गुजरातहून मैत्रिणीसह गोव्यात आलेला कल्पराज हा ३१ ऑगस्ट रोजी गुजरातला परत गेल्यानंतर मध्यरात्रीपर्यंत साखळी येथील द व्हाईट हाउस या हॉटेलमध्ये केलेल्या पार्टीनंतर बाशुदेव बेपत्ता झाला आहे.

बाशुदेवचे पिता नारायण यांनी दिलेल्या माहितीनुसार, बाशुदेव पार्टीनंतर पणजीकडे कारने त्या मैत्रिणीसह निघाला असताना त्याच्या कारसमोरून येणाऱ्या कारला घासली गेली. त्या कारमधील लोकांनी पाठलाग सुरू केल्याने बाशुदेवने सांतइस्तेव फेरीधक्क्याकडे कार वळवली. त्या अपघातात बुडालेल्या कारमधील माशूम पटेल ही युवती वाचली, तर बाशुदेव बेपत्ता झाला.

बाशुदेवचे पिता नारायण यांनी आज ‘गोमन्तक’ला सांगितले, की या घटनेनंतर त्यांनी गुजरात सोडण्याचा निर्णय घेतला. सध्या ते पोखरा (नेपाळ) येथे घराचे बांधकाम करत आहेत. त्यांचा मोठा मुलगा बलराम हा पोखरा येथे हॉटेल चालवतो. सध्या त्यांचे कुटुंबीय पोखरा येथेच आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT