Mapusa Theft Case  Dainik Gomantak
गोवा

Mapusa Theft Case : बार्देश मंदिर चोरी प्रकरणाचा 24 तासांत छडा, मुद्देमालासह एक अटकेत

म्हापसा पोलिसांची यशस्वी कारवाई

गोमन्तक डिजिटल टीम

Mapusa Theft Case कार्यतत्पर असलेल्या गोवा पोलिसांच्या सतर्कतेने अनेक गुन्ह्यांचा तातडीने शोध लावला जात असून दोन दिवसांपूर्वी म्हापसा बार्देझ येथील विठ्ठल रुक्मणी मंदिरात झालेल्या चोरी प्रकरणी म्हापसा पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

या तपासादरम्यान म्हापसा पोलिस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यावेळी त्यांना मंदिराच्या आवारात अज्ञात व्यक्ती प्रवेश करून वस्तूंची चोरी करत असल्याचे दिसून आले.

शेवटी विशेष पथकाच्या सहाय्याने 24 तासांत पोलिसांना आरोपी श्रीकांत रा. गुरुनाथ पट्टण (वय-33 वर्षे, हुबळी-कर्नाटक) याला अटक करण्यात यश आलंय.

दरम्यान आरोपी श्रीकांत याच्याकडून मंदिरातील मोबाइल हँडसेट, 30 ग्रॅम वजनाचे चांदीचे शिवलिंग आणि मंदिराचा एक पेनड्राईव्ह असे सर्व साहित्य पोलिसांनी हस्तगत केलंय.

एसडीपीओ म्हापसा जिवबा दळवी आणि पीआय म्हापसा परेश नाईक यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला होता. एसपी उत्तर निधिन वलसन यांच्या देखरेखीखाली संपूर्ण प्रकरणाचा छडा लावण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT