Crime News Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: KYC करण्यासाठी OTP सांगितला आणि 2.54 लाखांचा बसला फटका, बँकेचा प्रतिनिधी असल्याचे भासवून महिलेला घातला गंडा

Bank Fraud At Arlem: पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. सध्या पोलिस त्याचा शोध घेत आहेत. पोलिस निरीक्षक अरुण गावस देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

Sameer Panditrao

मडगाव: बँक ऑफ इंडियाचा प्रतिनिधी असल्याचे एका भामट्याने भासवून केवायसी फॉर्म भरायचा बाकी आहे असे सांगून एका महिलेच्या बँक खात्यातील २ लाख ५४ हजार रुपये परस्पर काढून त्या महिलेला गंडा घातला. याप्रकरणी मायणा-कुडतरी पोलिस ठाण्यात तक्रार नोंद झाली आहे.

पोलिसांनी हम्मीद मुल्ला या संशयिताविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. सध्या पोलिस त्याचा शोध घेत आहेत. पोलिस निरीक्षक अरुण गावस देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

आर्ले-राय येथील ४९ वर्षीय महिला तक्रारदार आहेत. फसवणुकीची ही घटना मागच्या वर्षी २२ ऑक्टोबर रोजी घडली होती. संशयिताने या महिलेला मोबाईलवरून कॉल केला.

आपण बॅंक ऑफ इंडियाचा प्रतिनिधी असल्याचे सांगताना तुम्ही तुमच्या बॅंक खात्याचे केवायसी केले नसल्याचे सांगितले. तुमचे खाते गठीत झाल्याचेही सांगताना, ते पुन्हा सुरू करण्यासाठी त्या खात्याची तपशीलवार माहिती त्या संशयिताने घेतली.

आता जो तुम्हाला ओटीपी क्रमांक येईल तो पाठविण्यास सांगितले. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तक्रारदाराने बँक खात्याबद्दल सर्व माहिती देताना आलेला ओटीपी क्रमांकही दिला. नंतर संशयिताने महिलेच्या बॅंक खात्यातील २ लाख ५४ हजार ९९६ रुपये काढले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT