Crime News Dainik Gomantak
गोवा

Dona Paula Theft: दोनापावलातील दरोड्यामागे बांगलादेशी टोळ्याच, पोलिसांना मिळाली छायाचित्रे; चोरांचा ठावठिकाणा सापडेना

Nagali Hills Theft: दोनापावला येथील नागाळी हिल्स भागात प्रसिद्ध उद्योजकाच्या एक मजली बंगल्यावर सशस्त्र दरोड्यातील बुरखाधारी बांगलादेशी दरोडेखोरांचे धागेदोरे पणजी पोलिसांच्या हाती लागले आहेत.

Sameer Panditrao

पणजी: दोनापावला येथील नागाळी हिल्स भागात प्रसिद्ध उद्योजकाच्या एक मजली बंगल्यावर सशस्त्र दरोड्यातील बुरखाधारी बांगलादेशी दरोडेखोरांचे धागेदोरे पणजी पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्यातील काहीजणांची छायाचित्रेही मिळाली आहेत. मात्र, त्यांचा ठावठिकाणा लागलेला नाही. बांगलादेश हा वेगळा देश असल्याने या प्रकरणाचा शोध घेण्यासाठी अडचणी येत असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

या दरोड्यानंतर काही दिवसांतच पोलिस महासंचालक आलोक कुमार यांनी या प्रकरणी काही धागेदोरे मिळत असल्याचे विधान केले होते. मात्र, दरोडेखोर हाती लागले नसल्याने त्याची माहिती उघड केली नव्हती. या दरोड्यानंतर नागाळी हिल्स भागात पोलिस गस्त वाढवण्यात आली होती.

या दरोड्यामागे बांगलादेशी टोळी असल्याचे सिद्ध झाले आहे. मात्र, त्यांचा थांगपत्ता लागत नाही. या दरोडेखोरांची माहिती व छायाचित्रे सर्व पोलिस स्थानकातील गुप्तचर यंत्रणेच्या पोलिसांना देण्यात आली आहेत. सध्या पावसाचे दिवस असल्याने परराज्यातील चोरट्यांच्या टोळ्या गोव्यात येत असतात. त्यामुळे राज्यातील पोलिस सक्रिय झाले आहेत.

पणजी पोलिसांनी या दरोडाप्रकरणी तेथील परिसरातील सीसी टीव्ही फूटेज घेतले आहेत तसेच त्या परिसरातील बांधकामच्या ठिकाणी कामगारांना घटनेच्या आवारात संशयास्पद फिरणाऱ्या व्यक्ती आढळून आल्या होत्या का याची विचारपूस केली आहे. मात्र, त्यातून पोलिसांना काहीच माहिती मिळालेली नाही. दरोडेखोरांची माहिती मिळाली. मात्र, त्यांचा ठावठिकाणाच लागत नसल्याने सध्या तरी या प्रकरणाचा तपास ठप्प झाला आहे.

इतर राज्यांतही दरोडे

या बंगल्यावर दरोडेखोरांनी नियोजनबद्धरित्या दरोडा घातला होता व कोणतेही पुरावे न ठेवता ते तेथून पसार होण्यात यशस्वी ठरले होते. पणजी पोलिस स्थानकाच्या गुप्तचर यंत्रणेने या प्रकरणातील काही धागेदोरे मिळवण्याचा प्रयत्न करेपर्यंत दरोडेखोर भारतातून पसार झाले होते.

त्या दरोडेखोरांची ओळख पटली असली तरी ते बांगलादेशमधील त्यांच्या मूळ पत्त्यावर राहत नाहीत. या बांगलादेशी टोळीने भारतातील इतर राज्यातही दरोडे घातल्याची माहिती समोर आली आहे. हे दरोडेखोर भारतात परत येण्याच्या प्रतीक्षेत पणजी पोलिस आहेत.

दरोडा घातल्यानंतर ही टोळी आपल्या देशात परतते व काही दिवस पोलिसांना चकमा देऊन पुन्हा सक्रिय होते. त्यामुळे या टोळीची वाट पाहावी लागणार आहे, असे मत या अधिकाऱ्याने व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lashkar e Taiba Commander Encounter: पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड हाशिम मूसा एन्काउंटरमध्ये ढेर! 527 दिवसांचा थरार संपला; भारतीय सैन्याची मोठी कारवाई VIDEO

Viral Video: ट्रेन थांबली नसती तर... सेकंदाचा खेळ अन् घडला भयंकर प्रकार; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ तूफान व्हायरल

India vs Pakistan: एक-दोन नव्हे तर तब्बल 3 वेळा होऊ शकते भारत-पाकिस्तानची टक्कर! वर्ल्ड कप 2027 चं संपूर्ण गणित जाणून घ्या

Canacona Water Crisis: काणकोणमधील बंधारे अद्याप खुलेच; नद्या-नाले कोरडे, पाणीटंचाईचे संकट गडद

Municipal Election: पालिका प्रभागरचनेची घाई; सरकार-निवडणूक आयोग आमनेसामने, '24 तासांत काम कसे करणार?'

SCROLL FOR NEXT