Goa taxi Dainik Gomantak
गोवा

Viral Post: बंगळूरच्या तरुणाने दिला Cheat Code, गोव्यात टॅक्सी भाड्याचा दर कमी करणारं 'ते' एक वाक्य होतंय व्हायरल!

Goa taxi cheat code: एका व्यक्तीने टॅक्सी भाड्याशी दोन हात करण्यासाठी एक गमतीशीर 'सिक्रेट कोड' शेअर केला

Akshata Chhatre

समुद्रकिनारे, पार्ट्या आणि खाद्यसंस्कृतीमुळे गोवा हे देशातील सर्वोत्तम पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते. मात्र, अनेक पर्यटक नेहमीच स्थानिक टॅक्सी सेवांवर आणि टॅक्सी चालकांकडून आकारल्या जाणाऱ्या अवाजवी भाड्यांवर नाराजी व्यक्त करतात. हा विषय पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आला आहे, जेव्हा एका व्यक्तीने टॅक्सी भाड्याशी दोन हात करण्यासाठी एक गमतीशीर 'सिक्रेट कोड' शेअर केला.

'सिक्रेट कोड'मुळे टॅक्सी भाडे १० पट कमी!

एक्स (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका युजरने पोस्ट करून स्थानिक आणि बाहेरील पर्यटकांना आकारल्या जाणाऱ्या भाड्यांमध्ये फरक असल्याचा दावा केला. त्याने लिहिले, "गोव्यातील टॅक्सी चालकांचे स्थानिक आणि बाहेरील लोकांसाठी वेगवेगळे दर असतात.

तुम्ही स्थानिक आहात हे सिद्ध करण्यासाठी, तुम्हाला चालकाला एक 'सिक्रेट कोड' सांगायचा आहे आणि तो ताबडतोब तुमच्याकडून 'बाहेरील व्यक्ती'च्या भाड्याच्या केवळ १/१० पट भाडे आकारेल.

मी गेल्या महिन्यात गोव्यात हा कोड वापरला. तो कोड आहे, ‘God tumhara bhala karega, my son’ हा कोड व्हायरल होताच त्याला ३ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आणि कमेंट्समध्ये अनेक लोकांनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या.

गोव्यातील लोकांनीही व्यक्त केल्या प्रतिक्रिया

या पोस्टवर अनेक गमतीदार प्रतिक्रिया आल्या. एका युजरने "माय सन, तू आम्हाला एक मस्त हॅक दिलास," असे म्हटले, तर दुसऱ्याने, "जो चालक माझ्या वडिलांच्या वयाचा असेल, त्याला हे कसे सांगायचे?" असा मिश्किल प्रश्न विचारला.

गोव्यात राहणाऱ्या एका व्यक्तीने कबूल केले की त्यांनाही असा 'कोड' अस्तित्वात असल्याची कल्पना नव्हती आणि "मी गोव्यात राहतो आणि मला हे माहीत नव्हते. नक्कीच ट्राय करेन," असे तो म्हणाला.

एका व्यक्तीने दावा केला की, "मी पूर्वी गोव्यात स्थानिक होतो आणि आता पर्यटक आहे. तुम्ही वेगवेगळ्या दरांबद्दल बरोबर बोलत आहातपण खरा गुपित कोड आहे 'पात्रांव...' यात एका गोव्यातील व्यक्तीने स्पष्टपणे असेही सांगितले, "गोव्याची भाषा बोलूनही काही उपयोग होत नाही, कारण बहुतेक टॅक्सी चालक बाहेरचे असतात."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

घराजवळ चर्च आहे का? गोव्यात घर घेतल्यानंतर अर्शद वारसीच्या सासू-सासऱ्यांनी त्याला पहिला प्रश्न काय विचारला? VIDEO

गोवा जिल्हा पंचायत अध्यक्षपदासाठी अर्ज सादर; उत्तरेत भाजपच्या रेश्मा बांदोडकर, दक्षिणेत सिद्धार्थ गावस तर काँग्रेसतर्फे लुईझा रॉड्रिग्ज रिंगणात

Accident News: गोव्याची सहल ठरली अखेरची; सोलापूरजवळ भीषण अपघात, दोन जिवलग मित्रांचा मृत्यू

MS Dhoni Viral Video: सिगारेटचं पाकीट धोनीचं की साक्षीचं? सलमानच्या पार्टीदरम्यानचा 'तो' व्हिडिओ व्हायरल, नेटकऱ्यांनी 'माही'ला धरलं धारेवर

पक्षश्रेष्ठींचा आशीर्वाद घेऊनच परतणार; अग्निकांड आणि ZP निवडणुकीनंतर CM सावंतांनी गाठली दिल्ली

SCROLL FOR NEXT