Banastarim Bridge Accident Dainik Gomantak
गोवा

Banastarim Bridge Accident: मेघना सावर्डेकरला कोर्टाचा दिलासा! 23 ऑगस्टपर्यंत अटक न करण्याचे कोर्टाचे निर्देश

पुढील सुनावणी 23 ऑगस्टला

Kavya Powar

Banastarim Bridge Accident: बाणस्तारी अपघात प्रकारण रोज नवे वळण घेत आहे. मेघना सावर्डेकरला 23 ऑगस्टपर्यंत अटक न करण्याचे निर्देश फोंडा उत्तर गोवा सत्र न्यायालयलाने दिले आहेत. याआधी कोर्टाने आज 16 ऑगस्टपर्यंत मेघनाला अटक न करण्याचे निर्देश पोलिसांना दिले होते त्याची मुदत आज संपली आहे.

आता या प्रकरणातील पुढील सुनावणी 23 ऑगस्टला होणार आहे. दरम्यान, पती परेश सावर्डेकरला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. अजूनही प्रकरणात ठोस कोणतीच कारवाई झाली नसल्याने नागरिकांनी पोलिसांच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यामुळे संतप्त जमावाने याविरोधात मेणबत्ती मोर्चाही काढला.

अपघात प्रकरण सांभाळण्यासाठी म्हार्दोळ पोलीस असमर्थ....

दरम्यान, आमदार राजेश फळदेसाई यांनी या प्रकरणात उडी घेतली असून म्हार्दोळ पोलीस हे प्रकरण सांभाळण्यासाठी असमर्थ असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. याप्रकरणी आपण सोमवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मेघनाला सावर्डेकरला कोर्टाचा मिळालेला दिलासा नागरिकांचा आणि मृतांच्या कुटुंबियांचा रोष वाढवण्यास कारणीभूत आहे. 23 ऑगस्टला मेघनाबाबतीत न्यायालयात नेमका काय निवाडा होणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT