Banastarim Bridge Accident: Amit Palekar Arrested Dainik Gomantak
गोवा

Banastarim Bridge Accident: पालेकर व लमाणीच्या जामिनावर सोमवारी निर्णय

गुरुवारी क्राईम ब्रँचने पालेकर यांना अटक केली होती

गोमन्तक डिजिटल टीम

Adv. Amit Palekar Bail Plea Order Reserved: बाणस्तारी मर्सिडीझ कारच्या अपघात प्रकरणी अंतरिम जामीन मिळालेले आम आदमी पक्षाचे नेते अमित पालेकर तसेच चालक राजू लमाणी यांच्या अर्जावर अंतिम सुनावणी सोमवारी होणार आहे.

पालेकर व राजू यांनी गुरुवारी जामिनासाठी अर्ज केला होता. न्यायालयाने त्यांना अंतरिम जामीन देऊन त्यावरील सुनावणी आज शुक्रवारी ठेवली होती. तर गुरुवारी क्राईम ब्रँचने त्यांना अटक केली होती.

बाणस्तारी येथील अपघातानंतर मर्सिडीस कारचा बनावट चालक पोलिसांसमोर उभा करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करून पालेकर यांना अटक करण्यात आली होती. गुरुवारी पालेकर यांच्यासह बनावट चालक राजू लमाणी यालाही पोलिसांनी अटक केली. 

दोघांनीही न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. रात्री नऊ वाजता ॲड. पालेकर व चालक राजू यांची फोंडा अतिरिक्त सत्र न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला.

बाणस्तारी अपघाताच्या दिवशी ज्या पार्टीला सावर्डेकर कुटुंब उपस्थित होते, त्यावेळी ॲड. पालेकर हेही पार्टीला उपस्थित राहिल्याची काही छायाचित्रे व्हायरल झाली होती. 6 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 7.30 वा पणजीच्या दिशेने येताना हा अपघात घडला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT