Balrath Employees Strike Dainik Gomantak
गोवा

Balrath Strike Ends: मुख्यमंत्र्यांची शिष्टाई यशस्वी; बालरथ कामगारांचा संप मागे

चालक, अटेंडंटच्या पगारात वाढ

Akshay Nirmale

Balrath Strike Ends: वेतनवाढीसाठी बालरथ कामगारांनी सुरू केलेला संप आज, बुधवारी मागे घेण्यात आला. या प्रकरणीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची शिष्टाई यशस्वी ठरली. त्यांनी कामगारांना पगारवाढीचे आश्वासन दिले. त्यानुसार आता बालरत चालकांचा पगार मासिक 17 हजार रूपये तर अटेंडंटचा पगार मासिक 10 हजार रूपये होणार आहे. या निर्णयानंतर कामगारांनी संप मागे घेतला.

वेतन वाढीच्या मागणीसाठी युनायटेड बालरथ कामगार युनियन संघटनेच्या अध्यक्षतेखाली राज्यातील सर्व बालरथ कामगार सोमवारपासून संपावर गेले होते.

पणजीतील आझाद मैदानावरही या कामगारांनी ठिय्या मांडला होता. या संपामुळे राज्यभरातील विद्यार्थ्यांची गैरसोय झाली. शिक्षण संचालनालयाने वाढवलेले वेतन कामगार संघटनेला मंजूर नव्हते. या संपात राज्यातील 420 बालरथांवरील चालक-क्लिनर असे 840 कामगार सहभागी झाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Social Media Post Controversy: अभिषेक शर्माची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट आणि फोटोंबाबत कोर्ट देणार अंतरिम आदेश

Sattari Heavy Rain: सत्तरीत वीजवाहिन्यांची मोठी हानी; वादळी वाऱ्यामुळे झाडांची पडझड सुरूच

Vasco Land Project: वास्कोतील सरकारी जमीन लाटण्याचा घाट! गरज पडल्यास विरोधासाठी रस्त्यावर उतरणार- जुझे फिलिप डिसोझा

Goa High Court: हॉटेल एफएआर घोटाळा: 2 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करा, अन्यथा मुख्य नगरनियोजकांना कोर्टात हजर राहावे लागेल

Goa Rough sea: बेतुल येथील फ्लोटिंग जेटी कोसळली; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, धोकादायक जेटी हटवण्याची मागणी

SCROLL FOR NEXT