Balli School Bus Accident
Balli School Bus Accident Dainik Gomantak
गोवा

School Bus Accident : बालरथ अपघाताचे कारण अजूनही अस्पष्टच

गोमन्तक डिजिटल टीम

School Bus Accident : मडगाव डिसेंबरच्‍या पहिल्‍या आठवड्यात बाळ्‍ळी येथे बालरथ उलटून जो अपघात झाला हाेता तो नेमका कोणत्‍या कारणामुळे यासंबंधातील कारण स्‍पष्‍ट करण्‍यास आरटीओ कार्यकारणी अपयशी ठरली आहे.

हा अपघात वाहनात निर्माण झालेल्‍या तांत्रिक चुकीमुळे की चालकाच्‍या हलगर्जीपणामुळे हे त्‍यामुळे स्‍पष्‍ट होऊ शकले नाही.कुंकळ्‍ळीच्‍या एका हायस्‍कूलचा हा बालरथ ७ डिसेंबर रोजी सकाळी मुलांना घेऊन परत कुंकळ्‍ळी जंक्‍शन येथे येत असताना बाळ्‍ळी हमरस्‍त्‍याच्‍या कडेला उलटला होता.

यामध्‍ये २४ विद्यार्थी जखमी झाले होते. त्‍यानंतर कुंकळ्‍ळी पोलिसांनी बसचालकाला अटकही केली हाेती. हा अपघात तांत्रिक कारणामुळे झाला की अन्‍य कारणामुळे हे शोधून काढण्‍यासाठी कुंकळ्‍ळी पोलिसांनी आरटीओला विनंती केली हाेती. मात्र, त्‍यांच्‍या चाैकशीतून काही निष्‍पन्न होऊ शकले नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Top News: चोर्ला घाट अपघातात तरुण ठार, कन्‍हैयाकुमार मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा नोंद; राज्यातील ठळक बातम्या

Goa Education: गोव्यात आता ITI मध्ये करता येणार दोन नवे कोर्स, 15 जुलैपासून सुरुवात; CM नी दिली महत्वाची माहिती

Bicholim News: कारवर कोसळले झाड; बैलासह म्हशीची सुटका

Assagao Demolition: आसगाव प्रकरणात CM आणि लोबो दाम्पत्याचा हस्तक्षेप! वकिलाचा युक्तीवाद, पूजाला जामीन मिळणार का?

Goa News: ...आणि मुख्यमंत्रीही झाले वारकरी !

SCROLL FOR NEXT