Subhash Shirodkar Dainik Gomantak
गोवा

Subhash Shirodkar : बैलपार जलप्रकल्प डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार

संपूर्ण पेडणे तालुक्‍याची भागणार तहान

दैनिक गोमन्तक

पेडणे : बैलपार-कासारवर्णे येथे उभारण्यात येणारा जलप्रकल्प हा पेडणे तालुक्याला पाणीपुरवठा करण्यावर लक्ष केंद्रित करून उभारण्‍यात येत आहे. या प्रकल्पाचे काम येत्या डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल, अशी ग्‍वाही जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी दिली.

बैलपार येथे बांधण्यात येणाऱ्या जलप्रकल्पाची पाहणी केल्यानंतर शिरोडकर पत्रकारांशी बोलत होते. यावेळी पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर, मांद्रेचे आमदार जीत आरोलकर, माजी आमदार दयानंद सोपटे, जल प्रकल्पाचे मुख्य अभियंते बदानी, पेडणे भाजप अध्यक्ष तुळशीदास गावस, विविध पंचायतींचे सरपंच, पंचसदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

बैलपार जलप्रकल्प हा मोपा विमानतळ व आयुष इस्पितळ नजरेसमोर ठेवून उभारण्‍यात येत आहे. बैलपार नदीचे पाणी मोपा विमानतळासारख्या प्रकल्पाला वापरल्यास शेती, बागायती धोक्‍यात येईल या भीतीने शेतकऱ्यांनी नदीत राहून ‘जलआंदोलन’ केले होते. ही बाब मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्यावर ते म्‍हणाले की, दर मिनिटाला नदीत हजारो लिटर पाणी वाहून जात आहे. त्याचा उपयोग करुया.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: मंदिरात दर्शन घेऊन बाहेर आला अन् गर्दीत चप्पल गायब! गोव्याच्या पठ्ठ्यानं थेट 'ChatGPT'ची घेतली मदत; काही क्षणांत... पाहा व्हायरल व्हिडिओ

राजकारणात खळबळ! पक्षाच्या कार्यालयात लटकलेल्या अवस्थेत आढळला नेत्याचा मृतदेह; सुसाइड नोटमध्ये लिहिलं, 'राजकारणात आलो, हीच मोठी चूक'

ICC ODI World Cup 2027: अखेर ठरलं! वनडे वर्ल्ड कपचा थरार 'या' तारखेपासून रंगणार; अंतिम सामन्याचीही तारीख निश्चित

Horoscope: रविवार ठरणार खास! वृषभ-कर्कसह 'या' राशींवर लक्ष्मीची कृपा, घरात सुख-समृद्धी अन् नोकरीत प्रमोशनचे संकेत

Government Jobs: कर्मचारी भरती आयोगाकडून 3 हजार नोकऱ्या; आता आणखी 2 हजार पदांसाठी सरकार सज्ज, CM प्रमोद सावंतांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT