Court  Dainik Gomantak
गोवा

Goa Rape Case: विदेशी तरुणीवरील बलात्कारप्रकरणी संशयित शकील अन्सारीला जामीन

Goa Rape Case: पीडित तरुणीने पोलिसांत व न्यायदंडाधिकाऱ्यांमसोर दिलेल्या जबानीत विसंगती आहे. त्यामुळे अटी घालून त्याला जामीन देणे योग्य होईल असे निरीक्षण उच्च न्यायालयाने केले आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Rape Case: विदेशी तरुणीला मद्यातून गुंगी देऊन तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी कोठडीत असलेल्या संशयित शकील अन्सारी ऊर्फ सलमान याला मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने सशर्त जामीन मंजूर केला. त्याची पार्श्‍वभूमी गुन्हेगारीची नाही व अटकेपासून तो कोठडीत आहे.

पीडित तरुणीने पोलिसांत व न्यायदंडाधिकाऱ्यांमसोर दिलेल्या जबानीत विसंगती आहे. त्यामुळे अटी घालून त्याला जामीन देणे योग्य होईल असे निरीक्षण उच्च न्यायालयाने केले आहे.

संशयित शकील अन्सारी याने वैयक्तिक 25 हजाराची हमी तसेच तत्सम रक्कमेचे एक किंवा दोन हमीदार सत्र न्यायालयाच्या समाधानानुसार सादर करावेत. खटल्यावरील सुनावणी संपेपर्यंत त्याने गोव्याबाहेर जाऊ नये.

प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी एकदा सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत खटला संपेपर्यंत हजेरी लावावी. त्याने राहत असलेला पत्ता तसेच संपर्कसाठी मोबाईल क्रमांक कळंगुट पोलिस स्थानकातील तपास अधिकाऱ्याला द्यावा अशा अटी आदेशात घालण्यात आल्या आहेत.

पीडित तरुणी कुटुंबीयांसमवेत 1 डिसेंबर 2022 रोजी गोव्यात आली होती. तिने काही मित्रांसह मद्य घेतले तेव्हा तिला तंद्री आली.खोलीत लैंगिक अत्याचार होत असल्याचे कळत होते.तंद्री कमी झाल्यावर दोन व्यक्तींपैकी एकजण लैंगिक अत्याचार करत असल्याचे दिसले त्यात शकील होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karnataka Accident: कर्नाटकात काळजाचा थरकाप उडवणारा अपघात! ट्रक-क्रूझरच्या भीषण धडकेत 6 तरुणांचा जागीच मृत्यू; 3 जण मृत्यूशी देतायेत झुंज

ENG vs IND: "तिलक वर्माला डच्चू द्या, संजू सॅमसनला खेळवा!" इंग्लंडविरुद्धच्या सलग पराभवानंतर माजी भारतीय कर्णधाराने साधला निशाणा; मॅनेजमेंटला घेतलं फैलावर

Ganesh Idol: विसर्जनानंतर किनाऱ्यांवर 'गणेशमूर्तीं'ची होणारी विटंबना, यंदा तरी कठोर कारवाई होणार का?

Zodiac Personality Traits: खिशाला कात्री लावणे यांच्या रक्तातच नाही! 'या' 3 ग्रहांचे राजे पैशांच्या बाबतीत का असतात एवढे कडक?

Social Media Post Controversy: अभिषेक शर्माची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट आणि फोटोंबाबत कोर्ट देणार अंतरिम आदेश

SCROLL FOR NEXT