Land Grabbing Case Dainik Gomantak
गोवा

Dovorlim Land Grab: दवर्ली जमीन हडप प्रकरणातील संशयित दोडामणी याला जामीन मंजूर

दुसरा संशयीत राजदीप कुंडईकर याला 12 जूनपर्यंत दिलासा

दैनिक गोमन्तक डिजिटल

Dovorlim Land Grab: दवर्लीतीलवृध्द व्यापाऱ्याची दवर्ली येथील जमीन हडप करण्याचा आरोप असलेला या प्रकरणातील सूत्रधार सलीम दोडामणी याला मडगाव प्रथम वर्ग न्यायालयाने 25 हजारांच्या जामिनावर मुक्त केले.

मृत झालेल्या नोटरीच्या नावे बनावट शिक्के तयार करून तसेच बनावट पॉवर ऑफ ॲटर्नी तयार करून जमीन हडपली गेली होती.

या प्रकरणातील दुसरा संशयीत राजदीप कुंडईकर हा अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात गेला असून आज त्याला तात्पुरता दिलासा देताना 12 जून पर्यंत न्यायालयाने त्याला पोलीसांनी अटक करू नये असे मडगाव पोलीसांना निर्देश दिले आहेत.

मध्यंतरी संशियातला पोलिसांनी चौकशीसाठी बोलावल्यास पोलिस स्थानकावर हजर रहावे असे सांगितले आहे.

दरम्यान या प्रकरणातील अन्य दोन संशयीत महमद इस्माईल ललनवार आणि इलियास अब्दुल धलायत याना यापूर्वीच अटकपूर्व जामिन मंजुर झाला आहे.

या प्रकरणी मडगाव पोलीसांनी मडगाव येथील एका नोटरीसह एकूण 5 जणावर फसवणूक व अफरातफरीचा गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की महमद सालेह मुसा या मडगाव येथील कपड्याच्या व्यापाऱ्याचे दवर्ली येथील दोन प्लॉट सलीम आणी राजदीप यांनी बनावट कागदपत्रे तयार करून घेऊन बनावट पॉवर ऑफ ॲटर्नीच्या आधारे ललनवार आणि धलायत यांना विकले.

यासाठी एका मृत नोटरीच्या नावाने बोगस कागदपत्रे तयार करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT