Drugs Dainik Gomantak
गोवा

अमली पदार्थ प्रकरणातील संशयिताला जामीन मंजूर

दक्षिण गोव्याचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्हिन्सेंट डिसिल्वा यांनी 50 हजारांचा जामिनावर केली मुक्तता

दैनिक गोमन्तक

मडगाव : अमली पदार्थ व्यवहार प्रकरणात मायणा कुडतरी पोलिसांनी एकाला अटक केली होती. याच अटक केलेल्या वारखंड फोंडा येथील नवीन नाईक या संशयिताला दक्षिण गोव्याचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्हिन्सेंट डिसिल्वा यांनी 50 हजार आणि तेवढ्याच हमीच्या जामिनावर मुक्त केलं आहे.

वारखंड फोंडा येथील रहिवासी असलेल्या नवीन याला मायणा कुडतरी पोलिसांनी अटक केली होती. त्याच्याकडून तब्बल दीड लाखांचा गांजाही पोलिसांनी जप्त केला होता. या प्रकरणी पोलिसांनी त्याचा साथीदार बिट्टू कुमार सिंग यालाही अटक केली होती. त्याच्या पोलीस कोठडीचा रिमांड संपल्याने त्यालाही न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे.

दरम्यान गोव्यात अमली पदार्थांच्या तस्करीसह जुगारासारख्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. मडगाव रेल्वे उड्डाण पुलाखाली एका आलिशान दुकानात चालू असलेल्या एका मिनी कॅसिनोवर मडगाव पोलिसांनी नुकतीच धाड घालून 9 जणांना अटक केली. भर बाजारात हा जुगार अड्डा चालू असूनही त्याकडे एवढे दिवस पोलिसांचे लक्ष गेले नव्हते. मात्र पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत सुमारे अडीच लाखांचा माल पकडला गेला आहे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral: 8 कोटींचे दागिने घालून नववधू मंडपात; पण व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांची एन्ट्री अन् वराला ठोकल्या बेड्या! नेमकी भानगड काय? Watch Video

Goa Crime: पर्वरी गोळीबाराचा कट उघडकीस येणार? यूपी-मुंबईतील तिघांना अटक; पोलिसांसमोर मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्याचं मोठं आव्हान

Bank Holiday: संप, शनिवार-रविवारची सुट्टी अन्‌ गणेश चतुर्थी! शुक्रवारपासून बँका सलग 5 दिवस बंद; ग्राहकांची होणार गैरसोय

Horoscope: शुक्रवार ठरणार भाग्यवान! 'या' राशींना मिळणार शुभवार्ता; नोकरी, व्यवसायात यशासोबत आर्थिक लाभाचीही शक्यता

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

SCROLL FOR NEXT