Goa Flights
Goa Flights  Dainik Gomantak
गोवा

Goa Indore Flight: खराब हवामानाचा फटका! एक तास हवेत घिरट्या घालत होतं विमान; प्रवाशांचा जीव टांगणीला

Pramod Yadav

Goa Indore Flight

इंदूरमध्ये मंगळवारी संध्याकाळी अचानक खराब झालेल्या हवामानाचा विमान वाहतुकीला फटका बसला. गोव्याहून इंदूरला येणाऱ्या विमानाला खराब हवामानामुळे लँडिगची परवानगी मिळाली नाही.

विमान तब्बल 1 तास इंदूरच्या आकाशात प्रदक्षिणा घालत राहिले. अखेर तासाभरानंतरही हवामान साफ ​​न झाल्याने विमान अहमदाबादला वळवण्यात आले.

विमानतळ व्यवस्थापनानुसार, इंडिगो फ्लाइट 6E813 गोव्याहून दररोज दुपारी 2.45 वाजता सुटते आणि 4.30 वाजता इंदूरला पोहोचते. मंगळवारी, फ्लाइटने वेळेवर उड्डाण केले आणि इंदूरच्या हवाई क्षेत्रात पोहोचले.

पण, अचानक येथील हवामान खराब झाले आणि त्यानंतर एटीसीने विमानाला लँडिगची परवानगी नाकारली. सुमारे अडीच तास आकाशात घिरट्या मारल्यानंतर सायंकाळी 5.35 वाजता विमान अहमदाबादसाठी रवाना झाले. नंतर हवामान स्वच्छ झाल्यावर विमान 8 वाजता इंदूरला पोहोचले.

दरम्यान, विमान बराचकाळ अवकाशात राहिल्याने विमानातील 166 प्रवाशांनी प्रचंड हाल सहन करावे लागले. नंतर विमान इंदूरहून रायपूरला रवाना झाले.

इंडिगो एअरलाइन्सने मंगळवारी सकाळी पुन्हा एकदा दिल्ली ते इंदूरचे फ्लाइट रद्द केले. दिल्लीहून इंदूरला सकाळी 10.35 वाजता येणारे आणि 11.05 वाजता दिल्लीला परतणारे विमान ऑपरेशनल कारणांमुळे रद्द करण्यात आल्याचे कंपनीने सांगितले. संतापलेल्या प्रवाशांनी विमानतळावर एकच गोंधळ घातला. कंपनीने प्रवाशांना रिफंड आणि री-बुकिंगचा पर्याय दिला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Muder Case: दारूची अर्धी बाटली ठरली तरुणाच्या खूनाचे कारण; मद्यधुंद मित्रानेच काढला काटा

Drummer William D'souza: प्रसिद्ध गोमंतकीय ड्रमर विलियम यांचे निधन; कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

Budget 2024: पीएम किसानच्या हप्त्यात होणार वाढ? कृषी तज्ञांनी अर्थमंत्र्यांकडे केली मोठी मागणी

Assagao Demolition: रमजानच्या दिवशी दोनापावल येथे शिजला घर पाडण्याचा कट, पूजा शर्माची अटक टाळण्यासाठी धडपड

Colva Police: सतावणूक केली, शंभर डॉलरही घेतले; कोलवाच्या 'त्या' PSI विरोधात आणखी एका महिलेची तक्रार

SCROLL FOR NEXT