Babush Monserrate Santa Cruz Office: Dainik Gomantak
गोवा

Babush Monserrate Santa Cruz Office: "परवानगी मागितली असती तर नकारच दिला असता!", बाबूश मोन्सेरात यांच्या कार्यालयावरुन भाजप प्रदेशाध्यक्षांनी स्पष्टच सांगितलं

Damu Naik On Babush Office: महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी सांताक्रुझ मतदारसंघात स्वतंत्र कार्यालय सुरू करण्याच्या निर्णयाची भाजपला कोणतीही पूर्वकल्पना नव्हती

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी सांताक्रुझ मतदारसंघात स्वतंत्र कार्यालय सुरू करण्याच्या निर्णयाची भाजपला कोणतीही पूर्वकल्पना नव्हती, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामोदर (दामू) नाईक यांनी बुधवारी स्पष्ट केले.

या निर्णयामुळे सांताक्रुझचे भाजप आमदार रुडॉल्फ फर्नांडिस यांनी नाराजी व्यक्त केल्याच्या पार्श्वभूमीवर पक्ष दोन्ही नेत्यांशी चर्चा करून तोडगा काढणार असल्याचेही त्यांनी सांगितले. सांताक्रुझमध्ये बाबूश मोन्सेरात कार्यालय सुरू करणार असल्याबाबत पत्रकारांनी विचारले असता नाईक म्हणाले की, हा निर्णय पक्षाच्या माहितीत नव्हता.

बाबूश यांनी यापूर्वी पक्षाची परवानगी मागितली असती, तर मतदारसंघात आधीच भाजपचा आमदार असल्याने स्वतंत्र कार्यालय सुरू करू नये, असा सल्ला त्यांना दिला असता. सांताक्रुझ मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे आमदार रुडॉल्फ फर्नांडिस यांनी या घडामोडीबाबत नाराजी व्यक्त केल्याचे समोर आले आहे.

त्यावर प्रतिक्रिया देताना नाईक यांनी पक्षात समन्वय राखणे महत्त्वाचे असून पक्षातील दोन्ही नेत्यांशी स्वतंत्रपणे चर्चा करून गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे स्पष्ट केले. सांताक्रुझमधील या घडामोडींमुळे भाजपमधील अंतर्गत समन्वयाचा प्रश्न चर्चेत आला असून, पक्षनेतृत्व या वादावर लवकरच पडदा टाकण्याचा प्रयत्न करणार असल्याचे नाईक यांच्या भूमिकेतून स्पष्ट झाले आहे.

गोवा फॉरवर्ड-काँग्रेसमधील संघर्ष बालिश

गोवा फॉरवर्ड आणि काँग्रेस यांच्यात आघाडीच्या मुद्यावरून सुरू असलेला संघर्ष हा बालिशपणाचा असल्याची टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामोदर नाईक यांनी केली. या दोन्ही पक्षांमधील वादाची भाजप दखलही घेत नसल्याचे स्पष्ट करत त्यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांनी किमान राजकीय पोक्तपणा दाखवून परिपक्व भूमिका घ्यावी, असा सल्ला दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT