Babu Kavalekar Dainik Gomantak
गोवा

भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी बाबू कवळेकर यांची निवड

माजी आमदार दयानंद सोपटे यांची पक्षाच्या सचिवपदी निवड करण्यात आली आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी : माजी उपमुख्यमंत्री चंद्रकांत ऊर्फ बाबू कवळेकर यांची बुधवारी पक्षाच्या राज्य उपाध्यक्षपदी निवड केल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष सदानंद शेट तानवडे यांनी दिली. बाबू कवळेकर यांच्याबरोबरच साळगावचे माजी आमदार जयेश साळगावकर आणि पेडण्याचे माजी आमदार दयानंद सोपटे यांची पक्षाच्या सचिवपदी निवड करण्यात आली आहे.

पक्षाच्या झालेल्या बुथ सशक्तीकरण कार्यक्रमात ही घोषणा करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, पक्षाचे संघटन सचिव सतीश धोंड, राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, सरचिटणीस दामू नाईक उपस्थित होते. येत्या काळात केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांची अमलबजावणी करण्यासाठी पक्षकार्य महत्त्वाचे असून, यासाठी सक्षम नेत्यांची पक्षाला गरज असल्याचे मत मुख्यमंत्री सावंत यांनी व्यक्त केले. केंद्राबरोबर राज्य सरकारच्या विविध योजनांची अमलबजावणी करण्यासाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार असल्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले. मुख्यमंत्री सावंत यांनी कवळेकर, साळगावकर व सोपटे यांची घोषणा करीत त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gold Rate: इराण शांतता करार ठरणार 'गेम चेंजर'! डॉलर घसरणार अन् सोन्याचा भाव गगनाला भिडणार; जे.पी. मॉर्गनचा 6000 डॉलर्सचा अंदाज

Aymen Hussein Story: आधी अल-कायदाने वडिलांना मारले, मग इसिसने भावाला पळवले! फिफा वर्ल्ड कपमध्ये इराकच्या अमीन हुसेनचा जगभर डंका

DR. Ram Manohar Lohia Journey: अकबरपूर ते बर्लिन अन् पुढे थेट गोव्याचा स्वातंत्र्यसंग्राम! डॉ. राममनोहर लोहियांच्या जागतिक जडणघडणीचा इतिहास

Calangute Theft: अवघ्या 20 मिनिटांत गाडीचा दरवाजा उघडला अन्...; कळंगुटमध्ये पर्यटकांना लुटणारी आंतरराज्य टोळी गजाआड! 21 महागडे मोबाईल जप्त

Goa Cyber Crime: ...अन् व्हॉट्सॲपवरील 'त्या' मेसेजने केला घात! 'ट्रेडिंग'च्या नावाखाली मडगावच्या महिलेला 33 लाखांचा गंडा; बंगळुरुच्या भामट्याला अटक

SCROLL FOR NEXT