Digambar Kamat Dainik Gomantak
गोवा

Digambar Kamat: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा पारंपरिक औषधोपचाराला प्राधान्य देतात

Health: आयुष डॉक्टरांसाठीच्या प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्‍घाटन मडगावचे आमदार दिगंबर कामत यांच्या हस्ते करण्यात आले.

दैनिक गोमन्तक

Health: आरोग्य खात्याच्या सहकार्याने राज्य कुटुंब कल्याण ब्युरो व गोवा बोर्ड ऑफ होमिओपॅथी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या आयुष डॉक्टरांसाठीच्या एकदिवसीय कार्यशाळेचे उद्‍घाटन मडगावचे आमदार दिगंबर कामत यांच्या हस्ते करण्यात आले.

दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाच्या सभागृहात आयोजित या कार्यशाळेच्या उद्‍घाटन समारंभाला गोवा बोर्ड ऑफ होमिओपॅथीचे चेअरमन डॉ. बिपीन साळकर, रजिस्ट्रार डॉ. राजेंद्रे काणेकर, राज्य कुटुंब कल्याण ब्युरोचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेद्र बोरकर, हवामान बदल विभागाच्या सल्लागार डॉ. गीतांजली कारे उपस्थित होत्या.

यावेळी आमदार दिगंबर कामत यांनी सांगितले, की लोकांना आजारातून त्वरित बरे व्हावेसे वाटते व ते एलोपॅथी औषधे घेतात, पण अशा औषधांना इतर परिणाम असतात. होमिओपॅथी व आयुर्वेद ही भारताची पारंपरिक औषधोपचार पद्धती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हेसुद्धा याच पारंपरिक औषधोपचाराला प्राधान्य देतात.

या औषधोपचाराचा दुष्परिणाम नसतो. गोव्यात होमिओपॅथी व आयुर्वेद औषधोपचाराला जेवढा पाहिजे तेवढा वाव नाही. त्यासाठी या दोन औषधोपचाराची जागृती होणे आवश्यक असल्याचे दिगंबर कामत यांनी सांगितले.

होमिओपॅथी किंवा आयुर्वेद उपचाराने लगेच आराम मिळत नसला, तरी रुग्ण कायमस्वरूपी त्या आजारातून मुक्त होऊ शकतो, असेही कामत यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT