FC Goa  Dainik Gomantak
गोवा

एफसी गोवा संघात युवा मध्यरक्षक

दैनिक गोमन्तक

पणजी: मिझोराममधील 19 वर्षीय मध्यरक्षक आयुष छेत्री याच्याशी एफसी गोवा संघाने तीन वर्षांचा करार केला आहे. 2025 मधील मोसमअखेरपर्यंत तो संघात असेल. आय-लीग फुटबॉल स्पर्धेच्या 2021-22 मोसमात ऐजॉल एफसीतर्फे खेळलेल्या आयुषने तीन गोल नोंदविले होते. इंडियन सुपर लीग (आयएसएल) स्पर्धेतील संघाने त्याची प्रथमच निवड केली आहे. (Ayush Chhetri from Mizoram has signed a three-year deal with FC Goa )

‘‘भारतीय फुटबॉलमध्ये एफसी गोवा हा एक उत्कृष्ट संघ आहे आणि या संघात रुजू होताना मला आनंद होत आहे. आयएसएल स्पर्धेत खेळणे हे माझे मोठे स्वप्न आहे आणि ती संधी दिल्याबद्दल मी एफसी गोवाचा अत्यंत आभारी आहे,’’ अशी प्रतिक्रिया आयुष याने करारपत्रावर सही केल्यानंतर सांगितले. ‘‘मध्यरक्षक असल्याने मला चेंडूवर नियंत्रण राखणे आवडते.

हा संघ माझ्यासारख्या फुटबॉलपटूंना उत्तेजन देतो, वर्चस्व राखून खेळण्याची त्यांची शैली आहे, त्यामुळे मी या संघाकडे आकृष्ट झालो. व्यवस्थापनाशी चर्चा केल्यानंतर या संघाच्या नियोजनात महत्त्वाची भूमिका असेल हे मी जाणले,’’ असे एफसी गोवाशी करार करण्याबाबत आयुष म्हणाला.

एफसी गोवाने भविष्यकालीन नियोजनावर लक्ष केंद्रित करून आयुषला करारबद्ध केले आहे. गेली काही वर्षे भारतीय फुटबॉलमधील उज्ज्वल भवितव्य असलेला खेळाडू असे त्याला मानले जाते आणि आम्ही त्याला योग्यवेळी संघात आणले आहे. गतमोसमातील आय-लीगमधील त्याची कामगिरी पाहता, तो आयएसएल स्पर्धेतील खेळाडूंच्या खांद्याला खांदा भिडवून खेळण्यास सज्ज झाल्याचे जाणवते, अशी प्रतिक्रिया एफसी गोवाचे फुटबॉल संचालक रवी पुस्कुर यांनी दिली.

आश्वासक उदयोन्मुख फुटबॉलपटू

- मिझोराममध्ये जन्मलेला आयुष छेत्री वयाच्या पाचव्या वर्षीपासून फुटबॉल मैदानावर

- युवा कारकिर्दीत ऐजॉल एफसीच्या 15 आणि 18 वर्षांखालील संघाचे प्रतिनिधित्व

- 2021-22 मध्ये ऐजॉल एफसीच्या सीनियर संघात बढती, आय-लीग पदार्पण

- आय-लीगमध्ये 19 वर्षीय खेळाडूचे 10 सामने, 3 गोल,

- यावर्षी 1 एप्रिल रोजी गोकुळम केरळाविरुद्ध पहिला आय-लीग गोल

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT