Ayurvedic Council  Dainik Gomantak
गोवा

कोविडच्या तिसऱ्या लाटेसाठी आयुर्वेदीक कौन्सिलची मार्गदर्शक तत्वे जारी

उपाध्यक्ष डॉ. महेश वेर्लेकर, डॉ. विनायक प्रभुदेसाई, डॉ. रिटा वाझ, डॉ. धर्मेन्द्र प्रभुदेसाई हे सदस्य उपस्थित होते.

दैनिक गोमन्तक

फातोर्डा: कोविडच्या (Covid 19) संभावीत तिसऱ्या लाटेसाठी व त्यातच लहान मुलांवर त्याचे जास्त परिणाम  होणार असल्याचे डेळ्यांसमोर ठेवून गोवा (Goa) कौन्सिल ऑफ आयुर्वेदीक एण्ड अदर एलाईड इंडियन सिस्टम्स ऑफ मेडिसिनने पालक व डॉक्टरांसाठी काही मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. या मार्गदर्शक तत्वांचे छापील पत्रकाचे आज मडगावात अनावरण करण्यात आले. या प्रसंगी कौन्सिलच्या चेअरमन डॉ. स्नेहा भागवत रजिस्ट्रार डॉ. दिलीप वेर्णेकर, उपाध्यक्ष डॉ. महेश वेर्लेकर, डॉ. विनायक प्रभुदेसाई, डॉ. रिटा वाझ, डॉ. धर्मेन्द्र प्रभुदेसाई हे सदस्य उपस्थित होते.

कोविडच्या संभावीत तिसऱ्या लाटेच्या वेळी पालकांवर जास्त जबाबदारी असेल. मार्गदर्शक तत्वांचे हे पत्रक सर्व इस्पितळांमध्ये लावले जाईल. शिवाय सर्व डॉक्टरांकडे हे पत्रक पोहोचते केले जाईल असे चेअरमन डॉ. स्नेहा भागवत हिने सांगितले. या पत्रकामध्ये पालकांनी कोविड काळात कोणकोणते नियम पाळावे, काय उपचार करावे, मुलांची देखभाल कशी करावी, त्यांचा आहार, योग व त्यांच्या दररोजचा ् क्रियाकलाप कसा असावा, लक्षणे दिसल्यास काय करावे याबद्दलची सर्व माहिती या पत्रकात दिल्याचे डॉ. भागवत यानी सांगितले. 

हे आयुर्वेदीक कौन्सिल राज्य सरकारने मे 2021मध्ये स्थापन केले असुन वर्षाकाठी जे 60 आयुर्वेदीक डॉक्टर उत्तिर्ण होतात त्यांची नोंदणी करुन त्याना परवाना देणे हे कौन्सिलचे काम असल्याचे रजिस्ट्रार डॉ. दिलीप वेर्णेकर यानी सांगितले. सुवर्ण प्राशन हे लहान मुलांना रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त ठरेल असे डॉ. भागवत यानी सांगितले. शिवाय सद्याच्या काळात तोंडाला मास्क बांधणे, अंतर ठेवणे व लस टोचून घेणे हे जास्त महत्वाचे असल्याचे डॉ रिटा वाझ हिने सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT