Ayesha Takia’s husband Farhan Azmi claims he faced racism at Goa airport; says CISF officer tried to touch his wife Dainik Gomantak
गोवा

गोवा विमानतळावर गैरवर्तन केल्याचा फरहान आझमीचा आरोप

फरहानचे नाव वाचून अधिकाऱ्यांनी केले गैरवर्तन

दैनिक गोमन्तक

अभिनेत्री आयशा टाकियाचा पती फरहान आझमीने गोवा विमानतळावर दोन अधिका-यांनी आपल्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप केला आहे. आयशा टाकियाच्या पतीने सोशल मीडियावर (Social media) ही माहिती दिली. मात्र, याप्रकरणी गोवा विमानतळाने (Goa Airport) नंतर फरहान आझमीची माफी मागितली.

खरे तर आयेशा टाकिया आणि तिचे पती नुकतेच आपल्या मुलासह गोव्याहून मुंबईला परतत होते. यादरम्यान त्यांना गोवा विमानतळावर थांबवण्यात आले. फरहानचे नाव वाचून काही अधिकाऱ्यांनी त्याला कुटुंबापासून वेगळे करून गैरवर्तन केले.

फरहानने अधिकाऱ्यांचे फोटो शेअर केले

फरहान आझमीने त्याच्या ट्विटर हँडलवर या घटनेची काही छायाचित्रे शेअर केली आहेत, गैरवर्तन करणाऱ्या अधिकाऱ्यांची छायाचित्रे आणि संपूर्ण घटनेबद्दल सांगितले आहे. फरहानने ट्विट केले की, 'प्रिय @CISFHQrs मी 6:40 वाजता मुंबईला जाणार्‍या फ्लाइटमध्ये चढत होतो आणि त्यानंतर अधिकारी आरपी सिंग, ए के यादव, कमांडर राऊत आणि एसपी श्रेणीचे वरिष्ठ अधिकारी बहादूर यांनी माझे नाव वाचताच माझ्या कुटुंबापासून मला वेगळे केले. फरहान आझमी हा सपा नेते अबू आझमी यांचा मुलगा आहे. फरहानच्या म्हणण्यानुसार, त्या अधिकाऱ्यांनी त्याच्यावर लैंगिक आणि वर्णद्वेषी टीका केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ENG 4th Test: गिल-राहुलचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या भूमीवर रचला नवा इतिहास, मोडला 23 वर्ष जुना रेकॉर्ड

Viral: मास्तर बनला प्रभु देवा...मुकाबला गाण्यावर केला जबरदस्त डान्स; पोरं झाली थक्क, WATCH VIDEO

Shravan Somvar 2025: मन:शांती आणि समस्यामुक्तीसाठी श्रावण सोमवार; जाणून घ्या रुद्राभिषेकाचे महत्त्व आणि सोपी पद्धत

Goa Village Tourism: "आम्हाला प्रकल्प हवाच!" सुर्ला ग्रामस्थांकडून इको-टुरिझमचे स्वागत; शासनाच्या प्रकल्पाला ग्रामसभेचा पाठिंबा

PM Narendra Modi: 'पंतप्रधान नरेंद्र मोदी भगवान विष्णूंचे 11वे अवतार!' भाजप नेत्याच्या वक्तव्याने खळबळ; सांगितले 'हे' कारण

SCROLL FOR NEXT