Awareness of Drug Abuse Dainik Gomantak
गोवा

Awareness of Drug Abuse: विद्यार्थ्यांना 'ड्रग ॲडिक्ट' करणारा नवा फास ; चॉकलेट, सॉफ्टड्रिंक्सद्वारे आकर्षित करण्याचा प्रयत्न

ड्रग्सविरोधी पॅनलमध्ये चर्चा; सतर्कतेची गरज, 2023 मध्ये 72 किलो ड्रग्स जप्त 2.17 कोटी किंमत

गोमन्तक डिजिटल टीम

बाराव्या वर्षापासून विशेषतः शरीरात रासायनिक बदल होत असतात. अशावेळी मुलांवर पालकांनी किंवा शिक्षकांनी वेळीच लक्ष दिले पाहिजे. सिगारेट ही व्यसनाकडे वळण्याची पहिली पायरी आहे. ते जर चांगले वाटले किंवा आवडले तर मग ड्रग्स सेवनाची सवय लागू शकते. अशावेळी पालकांनी घरातील मुलांची वागणूक, चीडचीड किंवा स्वभावात होणाऱ्या बदलांवर लक्ष ठेवावे, असा सूर तज्ज्ञ मंडळींच्या ड्रग्सविरोधातील पॅनलमधील चर्चेवेळी ऐकायला मिळाला.

सध्या ड्रग्स क्षेत्रात वावरणारे शाळेच्या अवतीभोवती पोहचल्याने चर्चेवेळी चिंता व्यक्त करण्यात आली. त्यानुसार, मुलांना ड्रग्सच्या नशेत खेचण्यासाठी शक्कल लढविली जात आहे. अशातच, ड्रग्स पेडलरकडून चॉकलेट व सॉफ्टड्रिंक्समध्ये कथित ड्रग्स मिसळून ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी नावीन्यपूर्ण मार्ग शोधले जात आहेत. त्यामुळे पालकांनी सतर्क राहून विद्यार्थ्यांच्या वर्तनावर लक्ष ठेवण्याची गरज असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

ड्रग्सचे सेवन आणि अवैध तस्करीविरुद्धच्या आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त उत्तर जिल्हा इस्पितळाच्या मानसोपचार विभागाच्या वतीने बुधवार, २८ रोजी म्हापसा येथील राज्य आरोग्य व कुटुंब कल्याण संस्थेत अमली पदार्थांच्या सेवनाच्या विविध पैलूंवर पॅनल चर्चेचे आयोजन केले होते. या पॅनलमध्ये सुप्रिया मांजरेकर, अ‍ॅड. ईशान उसपकर, पोलिस उपअधीक्षक नेरलॉन अल्बुकर्क, मानसोपचार तज्ज्ञ डॉ. तन्वी पेडणेकर व कालिदास घाटवळ यांचा समावेश होता. पॅनलद्वारे व्यसनमुक्ती उपचार, सोशल स्टिगमा व कायदेशीर बाबींसह विविध पैलंवर चर्चा झाली.

गरज जनजागृतीची

अ‍ॅड. ईशान उसपकर यांनी इयत्ता आठवीमधील अल्पवयीन मुलाचे उदाहरण दिले. ज्याला एका व्यक्तीने चॉकलेट देऊ केले आणि नंतर तो मुलगा व्यसनाच्या आहारी गेल्याचे समजले. नेहरू युवा केंद्रातील कालिदास घाटवळ म्हणाले की, अमली पदार्थांचे सेवन हे किनारपट्टीपुरते मर्यादित नसून ते खेड्यापाड्यांत पोहोचले आहे. तरुण वयातच मुले अमली पदार्थांच्या आहारी जात असून, यासाठीच जनजागृतीची गरज आहे.

विद्यार्थ्यांच्या बाबतीत योग्य वयात नियंत्रण करणे आवश्यक असते. कारण, इयत्ता अकरावी व बारावीमधील युवक ड्रग्सच्या व्यसनास बळी पडलेले आम्ही पाहिले आहेत. ज्यांना ड्रग्स तस्करांकडून लक्ष्य केले जाते. त्यांना सुरवातीस सेवनासाठी ड्रग्स पुरविले जातात व नंतर मुलांचा वापर वितरणासाठी केला जातो आणि हीच मुले पुढे ड्रग्ज विक्रेते बनतात.

नेरलॉन अल्बुकर्क, पोलिस उपअधीक्षक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral: 8 कोटींचे दागिने घालून नववधू मंडपात; पण व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांची एन्ट्री अन् वराला ठोकल्या बेड्या! नेमकी भानगड काय? Watch Video

Goa Crime: पर्वरी गोळीबाराचा कट उघडकीस येणार? यूपी-मुंबईतील तिघांना अटक; पोलिसांसमोर मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्याचं मोठं आव्हान

Bank Holiday: संप, शनिवार-रविवारची सुट्टी अन्‌ गणेश चतुर्थी! शुक्रवारपासून बँका सलग 5 दिवस बंद; ग्राहकांची होणार गैरसोय

Horoscope: शुक्रवार ठरणार भाग्यवान! 'या' राशींना मिळणार शुभवार्ता; नोकरी, व्यवसायात यशासोबत आर्थिक लाभाचीही शक्यता

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

SCROLL FOR NEXT