Awards will be given at the hands of Damodar Mauzo, International Book Festival in Kochi Dainik Gomantak
गोवा

कोचीत आंतरराष्ट्रीय पुस्तक महोत्सव, दामोदर मावजोंच्या हस्ते दिले जाणार पुरस्कार

यावेळी देशी विदेशी साहित्यिकांशी चर्चा, साहित्य विषयक कार्यशाळा, तसेच अन्य परिसंवाद ही होणार

दैनिक गोमन्तक

मडगाव : देशातील काही प्रमुख पुस्तक महोत्सवापैकी एक मानला जाणारा कोची येथील 24 वा आंतरराष्ट्रीय पुस्तक महोत्सव 1 ते 10 एप्रिल पर्यंत एर्नाकुलम मैदानात भरणार आहे. यावेळी होणाऱ्या पुरस्कार वितरण सोहळ्याला ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक दामोदर मावजो (Damodar Mauzo) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

4 एप्रिल रोजी हा पुरस्कार (Awards) वितरण सोहळा होणार असून यावेळी मावजो यांच्या हस्ते प्रो. एम. के. सानू यांना 'बालमणी अम्मा' हा पुरस्कार दिला जाणार आहे.

त्यापूर्वी 2 व 3 एप्रिल रोजी बाल साहित्य सोहळा साजरा होणार असून गोव्याचे राज्यपाल एम. श्रीधरन पिल्लई (P. S. Sreedharan Pillai) हे या सोहळ्याचे उद्घाटन करणार आहेत. यावेळी प्रसिद्ध फ्रेंच बाल साहित्यिक नादीने ब्रानओसमे हे खास निमंत्रित म्हणून उपस्थित राहणार आहेत.

2 ते 6 एप्रिल पर्यंत 'कोची लिटररी फेस्ट' आयोजित केले जाणार असून त्या दरम्यान सुमारे 50 पुस्तकांचे प्रकाशन होणार आहे. यावेळी देशी विदेशी साहित्यिकांशी चर्चा, साहित्य विषयक कार्यशाळा, तसेच अन्य परिसंवाद होणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT