Rajbhavan Book Scheme Dainik Gomantak
गोवा

Rajbhavan Book Scheme: लेखकाचे पहिले पुस्तक राजभवन करणार प्रकाशित, 'या' तारखेपर्यंत करता येईल अर्ज

कोंकणी आणि मराठीत प्रत्येकी 25 तर हिंदी आणि संस्कृतमध्ये 10 पुस्तकांचे प्रकाशन करणार

Akshay Nirmale

Rajbhavan Book Scheme: राजभवनतर्फे नवीन लेखकांसाठी एक प्रोत्साहन योजना सुरू करण्यात आली आहे. या नयी पहल योजनेंतगर्त आता नवीन लेखकांचे पहिले पुस्तक राजभवनतर्फे प्रकाशित केले जाणार आहे.

यामध्ये गोव्याची राज्यभाषा असलेल्या कोंकणी भाषेतील 25 आणि मराठी भाषेतील 25 पुस्तकांचा समावेश असेल. तर हिंदी आणि संस्कृत भाषेतील 10 पुस्तकेही प्रकाशित केली जाणार आहेत.

दरम्यान, या योजनेतून ज्या नवलेखकांना स्वतःचे पहिले पुस्तक प्रकाशित करायचे आहे, त्यांना 10 मार्च पर्यंत अर्ज करता येईल. राज्यपालांच्या विशेष अधिकाऱ्याकडे हा अर्ज करायचा आहे.

राजभवनतर्फे यासाठी एक समिती नेमण्यात आली आहे. आणि यात छाणणीसाठी येणारी पुस्तके टॉपच्या 60 साहित्यिकांकडून तपासून घेतली जाणार आहेत. कथात्मक (फिक्शन), नॉन फिक्शन, कविता या साहित्यकृतींना यात स्थान असणार आहे.

तर देशविरोधी किंवा देशाच्या धोरणांना विरोध करणारे साहित्य, राष्ट्रपुरूषांविरोधातील लिखाण, जात-पंथ-धर्म याबाबत भावना दुखावणारे लिखाण स्विकारले जाणार नाही.

बुधवारीच या योजनेबाबत राज्यपाल पी. एस. श्रीधरन यांनी माहिती दिली होती. राज्यपाल श्रीधरन म्हणाले होते की, कोंकणी भाषेतील तज्ज्ञांकडून हा अर्जांची छाननी केली जाईल. त्यानंतर पुस्तक प्रकाशनाबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.

दरम्यान, गतवर्षी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्यात उच्च न्यायालयाच्या कामकाजात इंग्रजीसोबत कोकणीचा वापर व्हावा, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT