MLA Michael Lobo Dainik Gomantak
गोवा

Goa Tourism: पर्यटन प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न : लोबो

Goa Tourism: कांदोळी व कळंगुट येथील समुद्राच्या पाण्यात ई-कॉलाय बॅक्टेरिया आढळून आल्याचा अहवाल तयार करून कोणीतरी गोव्याची पर्यटन प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करत आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Tourism: कांदोळी व कळंगुट येथील समुद्राच्या पाण्यात ई-कॉलाय बॅक्टेरिया आढळून आल्याचा अहवाल तयार करून कोणीतरी गोव्याची पर्यटन प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करत आहे. कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी बुधवारी मुख्यमंत्र्यांसोबत होणाऱ्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित करून यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.

सोमवारी दुपारी पर्वरी सचिवालयाबाहेर पत्रकारांशी बोलताना कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी कळंगुट आणि कांदोळी किनाऱ्यावरील समुद्राच्या पाण्यात ई-कोलायचे जीवाणू सापडल्याचा अहवाल तयार करून कोणीतरी गोव्याची पर्यटनाशी संबंधित प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. 

येत्या बुधवारी मुख्यमंत्र्यांसोबत होणाऱ्या बैठकीत हा प्रश्न उपस्थित करणार असून गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने तयार केलेल्या या तपासणी अहवालामागील अधिकारी कोण याचा शोध घेणार असल्याचे लोबो यांनी सांगितले.

पर्यटन धोक्यात ?

पर्यटन हंगामात, देशी-विदेशी पर्यटक सूर्य स्नान व आनंद घेण्यासाठी किना-यावर येतात. ई-कोलायची लागण झालेल्या किनाऱ्यांचा अहवाल आल्यास स्थानिक व्यवसायांना बाधा येईल. पर्यटनावर परिणाम होईल ,असे आमदार लोबो म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT