Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: रावण-सत्तरी येथे शाळकरी मुलीच्‍या अपहरणाचा प्रयत्न

Goa Crime: रावण-सत्तरी येथे सकाळी शाळेत जाणाऱ्या मुलीचे अपहरण करण्‍याचा प्रयत्‍न झाल्‍याची तक्रार तिच्या पालकांनी केरी-सत्तरी पोलिस चौकीत दाखल केली आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Crime: रावण-सत्तरी येथे सकाळी शाळेत जाणाऱ्या मुलीचे अपहरण करण्‍याचा प्रयत्‍न झाल्‍याची तक्रार तिच्या पालकांनी केरी-सत्तरी पोलिस चौकीत दाखल केली आहे. रावण येथील सरकारी प्राथमिक शाळेत इयत्ता चौथीत शिकणारी दक्षा दामोदर शेटकर ही मुलगी शनिवारी सकाळी 8 वाजता शाळेत गेली.

मात्र थोड्या वेळाने ती शाळेपासून जवळच असलेल्या आपल्या घराकडे जाऊन टिफिन घेऊन पुन्‍हा शाळेत परतत असताना एक काळ्या रंगाची गाडी तिच्याजवळ येऊन थांबली. त्‍या गाडीतील एका अज्ञात इसमाने तिला चॉकलेट दिले व ते देताना तिचा हात पकडला.

दुसऱ्या एकाने तिच्‍या कपड्यावर कसला तरी स्प्रे मारला. त्‍याक्षणी त्या मुलीने गाडीतील इसमाच्या हाताला चावा घेतला व आपला हात सोडवून घेतला. सुदैवाने तेवढ्यात तिथे एक स्कूटरस्‍वार महिला आली.

तिला बघून त्या गाडीने पळ काढला. दरम्‍यान, ती मुलगी तशीच धावत घाबरत शाळेत गेली. त्‍यादिवशी शाळेत बैठक असल्याने तिने सदर माहिती शिक्षकांना दिली नाही. मात्र नंतर घरी आल्‍यावर तिने पालकांना सर्व प्रकार कथन केला.

वडील दामोदर शेटकर यांनी लागलीच पोलिसांत तक्रार दाखल केली. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्‍या साहाय्‍याने पोलिसांनी या प्रकरणाच्‍या तळाशी जावे व दोषींना हुडकून काढावे. तसेच काळ्‍या काचांच्‍या गाड्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून करण्‍यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT