Attack in Businessman over rivalry in Calangute Dainik Gomantak
गोवा

कळंगुटमध्ये व्यावसायिकावर अज्ञातांचा जीवघेणा हल्ला

हल्ल्यानंतर दुचाकीवरुन आरोपी पसार, पोलिसांकडून संशयितांचा शोध सुरु

दैनिक गोमन्तक

कळंगुट : कळंगुटमध्ये पुन्हा एकदा हाणामारीची घटना घडली आहे. व्यावसायिक वादातून ही मारहाण झाल्याची माहिती आहे. वॉटरस्पोर्ट्स चालक असलेल्या व्यावसायिकावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे, ज्यात त्याला गंभीर इजा झाल्या आहेत. मास्क घालून आलेल्या दोघांनी रस्त्याने जात असलेल्या या व्यावसायिकावर सोमवारी सकाळी हल्ला केल्याचं उघड झालं आहे.

गुंडू नाईक असं हल्ला झालेल्या या व्यावसायिकाचं नाव असून कळंगुटमधील (Calangute) परबवाडा भागात तो राहतो. स्कूटरवरुन आलेल्या मास्कधारी दोन इसमांनी आपल्याला भररस्त्यात थांबवलं आणि शेजारील मैदानावर नेत लोखंडी रॉडने मारहाण केल्याचं व्यावसायिकाचं म्हणणं आहे. या मारहाणीत (Attack) व्यावसायिकाच्या पायाला आणि हाताला गंभीर दुखापत झाली आहे. मारहाण पाहून शेजारी नाईक यांच्या मदतीला धावले, मात्र तोपर्यंत अज्ञात हल्लेखोर आपल्या स्कूटरवरुन पसार झाले.

आपल्यावर जीवघेणा हल्ला करणारे हे वॉटरस्पोर्टशी संबंधित असल्याचा संशय मारहाण झालेल्या नाईक यांनी व्यक्त केला आहे. मारहाणप्रकरणी कळंगुट पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून नाईक यांना उपचारांसाठी म्हापसा येथे दाखल करण्यात आळे आहे. संध्याकाळी उशिरा पोलिसांनी (Police) त्यांचा जबाब नोंदवला आहे. या प्रकरणात अद्याप कुणालाही अटक झालेली नाही. मात्र पोलिसांनी आपण परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत असून संशयितांचा शोध घेत असल्याचं स्पष्ट केलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT