Lairai Devi Jatra Utsav Dainik Gomantak
गोवा

Lairai Devi Jatra Utsav : धोंडांचे ‘सोवळे’ व्रत सुरू; शिरगावात उत्‍साह

श्री लईराई देवीचा प्रसिद्ध जत्रोत्‍सव सोमवारी

दैनिक गोमन्तक डिजिटल

शिरगाव येथील प्रसिद्ध श्री लईराई देवीच्या जत्रोत्सवानिमित्त धोंड भक्तगणांच्या सोवळ्या व्रतास प्रारंभ झाला आहे. डिचोली तालुक्यातील बहुतांश गावांत धोंड कडक व्रत पाळताना दिसून येत आहेत.

देश-विदेशापर्यंत ख्याती आणि लाखो भक्तगणांचे श्रद्धास्थान असलेल्या लईराई देवीचा जत्रोत्सव यंदा सोमवार दि. 24 एप्रिल रोजी साजरा होत आहे.

या जत्रोत्‍सवानिमित्त गुरुवारपासून धोंड भक्तगणांनी परंपरेप्रमाणे कडक व्रत पाळण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्यात मोठा उत्साह दिसून येत आहे.

लहान-थोरांसह नवीन धोंड भक्तगणही व्रत पाळत आहेत. काही ठिकाणी महिला धोंडही आहेत. धोंड भक्तगणांच्या व्रतामुळे गावोगावी मंगलमय व भक्तिमय वातावरण पसरले आहे.

श्री लईराई देवीचे धोंड भक्तगण राज्‍यात गावोगावी विखुरलेले आहेत. डिचोली तालुक्यातील म्हावळिंगे, कुडचिरे, कारापूर, सर्वण, मये, हातुर्ली, नार्वे आदी बहुतांश भागात देवीचे धोंड आहेत. रविवारपासून सर्वत्र कडक व्रतास सुरुवात झाली आहे.

गुढीपाढव्यापासून म्हणजेच जत्रेच्या आधी महिनाभर धोंड भक्तगण शाकाहार पाळतात. तर, जत्रेला पाच दिवस असताना कडक सोवळे व्रत पाळले जाते.

रविवारी होणार ‘व्हडले’ जेवण

काही ज्येष्ठ धोंड भक्तगण तीन दिवस असताना सोवळे व्रत पाळतात. मंदिर वा नैसर्गिक तलाव आदी पवित्र ठिकाणी एकत्रित येऊन धोंड भक्तगणांच्या व्रताला सुरूवात होते.

व्रतस्थ काळात हे धोंड स्नान करून ओले राहूनच ‘श्री लईराई माता की जय’ असा जयघोष करतात व आहार घेतात. जत्रेच्या आदल्या रात्री व्रतस्थ ठिकाणी ‘व्हडले’ जेवणाचा कार्यक्रम होतो. यंदा रविवार दि. 23 एप्रिल रोजी ‘व्हडले’ जेवण होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sai Baba Temple Dispute: बोरीतील साईबाबा मंदिराचा ताबा अखेर ट्रस्टकडे! ग्रामस्थांचा विरोध, 21 महिला आंदोलकांवर गुन्हा; पोलिस बंदोबस्तात मंदिर ताब्यात

Section 39A: गणेशोत्सवात कलम '39-अ'चा होणार 'मोरया'! भूरूपांतराविरोधातील जनक्षोभ शमवण्यासाठी वादग्रस्त कलम वगळण्याच्या हालचाली

BRICS Summit 2026: "आम्ही कोणासमोरही झुकणार नाही!" भारताच्या भूमीवरुन इराणी अध्यक्षांचा अमेरिका-इस्रायलवर हल्लाबोल VIDEO

India Forex Reserve Record: भारताच्या परकीय चलन साठ्याने रचला इतिहास! फॉरेक्स रिझर्व्ह 785 अब्ज डॉलर पार; तुमच्या खिशावर काय होणार परिणाम?

Horoscope 12 September 2026: सूर्याचं नक्षत्र बदलताच 'या' राशींचं चमकणार भाग्य, शनिवार ठरणार वरदान; होणार अफाट धनलाभ

SCROLL FOR NEXT