37th National Games  Dainik Gomantak
गोवा

37th National Games साठी गोव्यात खेळाडू दाखल होण्यास सुरवात; दाबोळी विमानतळावर क्रीडा मंत्र्यांकडून स्वागत...

क्रीडा मंत्री गोविंद गावडेंनी आढावा बैठक

Akshay Nirmale

37th National Games Goa: गोव्यातील 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी देशभरातून खेळाडू गोव्यात येण्यास सुरवात झाली आहे. आज, मंगळवारी काही खेळाडू दाबोळी विमानतळावर दाखल झाले.

राज्याचे क्रीडा मंत्री गोविंद गावडे यांनी या विमानतळावर या खेळाडूंचे स्वागत केले. या वेळी वास्कोचे आमदार कृष्णा साळकरदेखील उपस्थित होते. दरम्यान, स्पर्धेचे व्हेन्यू कमांडंट्स आणि एक्झिक्युटिव्ह समन्वयकांसमवेत क्रीडा मंत्री गोविंद गावडेंनी आढावा बैठक घेतली.

विविध राज्यांमधून आज, सुमारे 156 खेळाडू गोव्यात दाखल झाले आहेत. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेला 19 ऑक्टोबरपासून सुरवात होत आहे. त्या दिवशी बॅडमिंटनच्या सामन्यांना सुरवात होईल. त्यामुळे स्पर्धेस प्रारंभ होण्यास अवघे 2 दिवस स्पर्धेला उरले आहेत.

तर 26 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत स्पर्धेचा उद्घाटन सोहळा रंगणार आहे. 9 नोव्हेंबरपर्यंत ही स्पर्धा चालणार आहे.

दरम्यान, स्पर्धेची तयारी पूर्ण झाली आहे, आम्ही स्पर्धेसाठी सज्ज आहोत, असे क्रीडा मंत्री गोविंद गावडे यांनी म्हटले आहे. देशभरातून येणाऱ्या खेळाडूंसाठी कांपाल येथे क्रीडानगरी उभारली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral: 8 कोटींचे दागिने घालून नववधू मंडपात; पण व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांची एन्ट्री अन् वराला ठोकल्या बेड्या! नेमकी भानगड काय? Watch Video

Goa Crime: पर्वरी गोळीबाराचा कट उघडकीस येणार? यूपी-मुंबईतील तिघांना अटक; पोलिसांसमोर मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्याचं मोठं आव्हान

Bank Holiday: संप, शनिवार-रविवारची सुट्टी अन्‌ गणेश चतुर्थी! शुक्रवारपासून बँका सलग 5 दिवस बंद; ग्राहकांची होणार गैरसोय

Horoscope: शुक्रवार ठरणार भाग्यवान! 'या' राशींना मिळणार शुभवार्ता; नोकरी, व्यवसायात यशासोबत आर्थिक लाभाचीही शक्यता

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

SCROLL FOR NEXT