Atal Setu  Dainik Gomantak
गोवा

Atal Setu: मार्ग कधी खुला होणार? प्रशासनाकडून महत्त्वाची अपडेट

कार्यपूर्तीसाठी कसरत ः ‘जी-20’ शिखर बैठकीमुळे युद्धपातळीवर काम सुरू

गोमन्तक डिजिटल टीम

Atal Setu मांडवी नदीवरील अटल सेतू राज्यातील ‘जी20’ शिखर परिषद सुरू होण्यापूर्वी पूर्णपणे खुला करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे. पर्वरीतून मेरशीकडे जाणारा या सेतूवरील रस्ता खुला करण्यात आला असला तरी पर्वरीकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम अजूनही पूर्ण झालेले नाही.

हा सेतू वाहनांसाठी रविवारपर्यंत खुला करण्याचे आश्‍वासन या शिखर परिषदेसाठीचे राज्याचे नोडल अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे. त्यामुळे हे काम पूर्ण करण्यासाठी तारेवरची कसरत सुरू आहे.

दरम्यान, पणजीहून पर्वरीकडे जाणाऱ्या रस्‍त्याचे काम आटोक्यात आणण्यासाठी सर्व ते प्रयत्न कंत्रादाराकडून केले जात आहेत.

सध्याची कामाची गती पाहता या रस्त्यावरील डांबरीकरणाचे काम सोमवारपर्यंत होण्याची लक्षणे अंधूक आहेत.

जर त्यांना जुन्या मांडवी पुलावरून नेण्यात आल्यास वाहतुकीच्या कोंडीमुळे फज्जा उडण्याची शक्यता आहे. सांगोल्डा या मार्गावर तर नेहमीच गर्दी असते.

सध्या अटल सेतूचा एकच रस्ता सुरू असल्याने पणजीहून पर्वरीकडे जाणाऱ्या वाहनांची सकाळी तसेच संध्याकाळच्या वेळी वाहनांचा रांगा लागत आहेत.

अटल सेतू जर दोन्ही बाजूने वाहतुकीसाठी खुला न झाल्यास जुन्या मांडवी पुलावरील वाहतूक सुरळीत करताना वाहतूक पोलिसांची तारांबळ उडणार आहे. सोमवारी वाहनांची वर्दळ असल्याने कोंडी होते.

निमंत्रितांना ‘सेतू’वरूनच नेण्याचा निर्णय : या शिखर बैठकीला विदेश व देशभरातून येणाऱ्या निमंत्रितांना गोव्याचे दर्शन तसेच पुरातन ठेवा पाहण्याची संधी मिळावी, यासाठी त्यांना अटल सेतूवरूनच त्यांची वाहने नेण्याचा निर्णय नोडल अधिकाऱ्यांनी घेतला आहे.

हा निर्णय बदलण्यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून त्यांची समजूत घालण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

सध्या वाहतूक कोंडीची शक्यता कायम !

एखादे वाहन नादुरुस्त होऊन वाहतुकीची कोंडी झाली तर वाहनांच्या रांगामध्ये हे निमंत्रित अडकले जाण्याची शक्यता आहे.

त्यामुळे या ‘जी२०’ शिखर परिषदेच्या निमंत्रितांना अटल सेतूवरून वा जुन्या मांडवी पुलावरून न नेता त्यांना कॅटमरान बोटींनी किनारपट्टीवर नेण्याची शिफारस एका वरिष्ठ अधिकाऱ्याने केली.

मात्र ती फेटाळली. त्यामुळे या निमंत्रितांचा ताफा जाताना वाहतुकीचा बोजवारा उडण्याची शंका व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SIR Guidelines: 'एसआयआर'च्या मार्गदर्शक तत्त्वांना सुप्रीम कोर्टाची कायदेशीर मान्यता? निवडणूक आयोगाच्या वकिलांचा दावा; गोवा खंडपीठात आजही सुनावणी सुरु

Gaza Revenge Plot Exposed: गाझाचा बदला घेण्यासाठी रचला कट, फ्लाईदुबईच्या को-पायलटचा धक्कादायक खुलासा, म्हणाला, 'मला शहीद व्हायचे होते'

SCROLL FOR NEXT