Panaji Traffic Video Dainik Gomantak
गोवा

Panaji Traffic Video: 'अटल सेतू' बंदचा प्रवाशांना फटका, तब्बल चार तास वाहतूक ठप्प

अटल सेतू वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद केल्याने सर्व वाहने जुना व नवीन मांडवी पुलावरून धावू लागली.

Pramod Yadav

Panaji Traffic Video: मांडवी नदीवरील अटल सेतू 27 मार्चपर्यंत दिवसा व रात्री वाहतुकीस बंद राहणार आहे. याबाबतचे आदेश उत्तर गोवा जिल्हाधिकारी मामू हागे यांनी जारी केले आहेत. दरम्यान, अटल सेतू वाहतुकीस बंद केल्यानंतर त्याचा या मार्गावरील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून, यामुळे जवळपास तीन तास वाहतूक कोंडी झाली होती.

अटल सेतू वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद केल्याने सर्व वाहने जुना व नवीन मांडवी पुलावरून धावू लागली. यामुळे पर्वरी, म्हापसा दिशेने जाणाऱ्या वाहनांची या मार्गावर मोठी कोंडी झाली.

दुरुस्तीच्या कामामुळे अटल सेतू 17 ते 27 मार्चपर्यंत दिवसा आणि रात्रीच्या वेळी वाहतुकीस बंद राहणार आहे. याबाबत आदेश उत्तर गोवा जिल्हाधिकारी मामू हागे यांनी जारी केले आहेत. अटल सेतूवरील दुस्तीचे काम केले जाणार आहे. यासाठी मोठ्या अवजड मशीन्सचा वापर केला जाणार असून, याकाळात पुल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे.

याचा फटका आज या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवशांना बसला, सोमवार असल्याने ऑफिससाठी जाणाऱ्या लोकांची मोठी वर्दळ या मार्गावर असते, शिवाय पर्यटक देखील या मार्गाचा वापर करत असतात.

दरम्यान, अटल सेतू बंद असल्याने पर्वरी, म्हापसा मार्गावर वाहतूक कोंडी झाली. यामुळे तब्बल चार तास वाहतुक ठप्प झाल्याचे दिसून आले.

यापूर्वी जुना आणि नवीन मांडवी पुल देखील बंद करण्यात आले होते.

दुरूस्तीच्या कामानिमित्त यापूर्वी नदीवरील जुना आणि नवीन मांडवी पुल देखील बंद करण्यात आला होता. दुरूस्ती आणि देखभालीच्या कामानिमित्त रात्रीच्या वेळेत या मार्गावरील देखील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lavani Marathi Folk Art: शेतातील 'लावण' की सौंदर्याचे 'लावण्य'? मराठी मातीशी जोडलेल्या लावणीची वास्तववादी व्याख्या

Hannah Arendt On Violence: दुष्टता ही राक्षसाकडून नाही तर स्वतंत्र विचार न करणाऱ्या सामान्य माणसाकडून घडते! हॅना आरेन्ट यांचे पथदर्शी विचार

Crime News: "तू तिच्याशी का बोलतोस?" बिअर पार्टीतून सुरू झाला वाद; संतापलेल्या तरुणाने ब्लेडने सपासप वार करत मित्राला संपवलं

Verna: टेम्पोवर कोसळली वीजवाहिनी; छत्तीसगडच्या 30 वर्षीय क्लिनरचा मृत्यू

Shani Vakri 2026: शनिदेवांची उलटी चाल! 'या' राशींना बसणार मोठा आर्थिक फटका; नोकरी-व्यवसायात वाढणार मानसिक ताण

SCROLL FOR NEXT