BJP Dainik Gomantak
गोवा

आता तरी सांगेला मंत्रिपद द्यावे; सांगेवासीयांची मागणी

सांगेवासीयांची मागणी; सरकारने विकासाकडे लक्ष द्यावे

दैनिक गोमन्तक

केपे: सांगे मतदारसंघ परत एकदा ताब्यात घेण्यास भाजपा कार्यकर्ते यशस्वी ठरले. आतापर्यंत पाचवेळा सांगे मतदारसंघाचे लोक प्रामाणिकपणे भाजपाबरोबर राहिले असल्याने यावेळी तरी मंत्रिपद देऊन लोकांचा विश्वास सार्थ ठरवावा, अशी मागणी संगेवासीयांनी केली आहे.

डॉ. प्रमोद सावंत परत एकदा मुख्यमंत्रिपदी विराजमान होणार असल्याचे निश्चित झाले असल्याने सावंत यांनी आपल्या मंत्रिमंडळात सुभाष फळदेसाई यांना स्थान देऊन सांगेवासीयांचा गौरव करावा अशी मागणी लोकांकडून होत आहे.

सांगे मतदारसंघ भौगोलिकदृष्ट्या बराच मोठा आहे. या मतदारसंघात अद्याप बरीच विकासकामे प्रलंबित असल्याने ही कामे मार्गी लावण्यासाठी तसेच युवकांच्या रोजगाराच्या समस्या सोडवण्यासाठी सावंत यांनी फळदेसाई यांना मंत्रिपद द्यावे, अशी मागणी रीवण पंचायतीचे सरपंच सूर्यकांत नाईक यांनी केली आहे. गेली कित्येक वर्षे सांगे मतदारसंघाला मंत्रिपद लाभले नसून, प्रत्येक सरकार सांगेकडे दुजाभाव करीत असल्याची भावना लोकांकडून व्यक्त होत असल्याचे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT