Vishwajit Rane, Lung Cancer AI Treatment Dainik Gomantak
गोवा

Lung Cancer: फुफ्फुस कर्करोगाच्या निदानासाठी AI ची मदत! विश्‍वजित राणेंनी दिली माहिती; 50842 नागरिकांची तपासणी

Vishwajit Rane: अ‍ॅस्ट्रा झेनेका, आरोग्य संचालनालय आणि क्युअर एआय यांच्यातील सामंजस्य करार आणखी दोन वर्षांसाठी वाढवण्यात आल्याचे देखील मंत्र्यांनी स्पष्ट केले.

Sameer Panditrao

पणजी: फुफ्फुसाच्या कर्करोगाचे लवकर निदान करण्यासाठी अ‍ॅस्ट्रा झेनेका कंपनीने अत्याधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) साधनांच्या मदतीने आतापर्यंत ५०,८४२ नागरिकांची तपासणी यशस्वीरीत्या पूर्ण केली असल्याची माहिती आरोग्य मंत्री विश्‍वजित राणे यांनी दिली.

लवकर निदानामुळे उपचार वेळेत सुरू होऊन रुग्णांचे जीवन वाचविण्यास मदत होते. अ‍ॅस्ट्रा झेनेका, आरोग्य संचालनालय आणि क्युअर एआय यांच्यातील सामंजस्य करार आणखी दोन वर्षांसाठी वाढवण्यात आल्याचे देखील मंत्र्यांनी स्पष्ट केले.

या पुढाकाराचा पुढचा टप्पा अधिक व्यापक स्वरूपात राबवण्यात येणार असून आता अधिक नागरिकांची स्क्रीनिंग, रुग्ण ट्रेकिंग प्रणालीचा विस्तार होणार आहे, असे राणे यांनी सांगितले. फुफ्फुसाचा कर्करोग शोधणे हे एक आव्हान आहे. लवकर निदान करण्यासाठी एआय वापर करण्यात येतो. एआय फुफ्फुसातील चिन्हे ओळखण्यासाठी सीटी स्कॅनचे बारकाईने विश्लेषण करून भविष्यात फुफ्फुसाचा कर्करोग होण्याचा धोका कोणाला असू शकतो याचे मूल्यांकन करतो.

आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण

आरोग्य कर्मचारी व कार्यकर्त्यांसाठी नव्या प्रशिक्षण मोड्यूल्सची अंमलबजावणी देखील करण्यात येणार आहे. ही तंत्रज्ञानाधिष्ठित सर्वंकष प्रक्रिया गोमंतकीय नागरिकांसाठी लवकर निदान आणि उत्तम आरोग्यसेवा सुनिश्चित करेल, असा विश्वास मंत्री राणे यांनी व्यक्त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT