Goa Assagao pooja sharma  Dainik Gomantak
गोवा

Goa Assagao: ‘त्या’ घटनेशी संबंध नाही; पूजा शर्मा स्वत:च्या मतावर ठाम

Goa Assagao House Demolition Case: तब्बल तीन तास चौकशी; पोलिसांना काहीच ठोस पुरावे हाती लागले नाहीत

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: आसगाव घर मोडतोड प्रकरणातील मुख्य सूत्रधार पूजा शर्मा हिची आज दुसऱ्या दिवशीही क्राईम ब्रँचच्या एसआयटीने चौकशी केली. या घटनेशी माझा काहीच संबंध नसल्याच्या विधानाशी ती ठाम राहिली आहे.

आज तब्बल तीन तास चौकशी करण्यात आली. मात्र त्यातून पोलिसांना काहीच ठोस पुरावे हाती लागले नाहीत. उच्च न्यायालयाने तिला अटकपूर्व जामीन दिला असल्याने तिला अटक करण्यात काहीच अर्थ नाही. त्यामुळे आता तिला आवश्‍यकता भासल्यास चौकशीला बोलावले जाईल, अशी माहिती एसआयटीच्या सूत्रांनी दिली.

तक्रारदार आगरवाडेकर कुटुंबीयांनी तिच्याविरुद्ध हणजूण पोलिसांत बाऊन्सर्सचा वापर केल्याप्रकरणी तक्रार केली होती. त्यानुसार पोलिसांनी तिच्याविरुद्ध गुन्हा नोंद केला होता. घर मोडतोड तसेच आगरवाडेकर वडील - मुलाचे अपहरण करण्यात तिचा हात असल्याचा पुरावा चौकशीतून पुढे आलेला नाही.

यापूर्वीच संशयित अर्शद ख्वाजा याने या प्रकाराला आपण जबाबदार असल्याची कबुली दिली आहे. त्यामुळे संशयित पूजा शर्मा हिच्यावरील आरोप बोथट बनले आहेत. शिवाय आगरवाडेकर कुटुंबानेही तक्रार दाखल करून २४ तास होण्याआधीच ही तक्रार मागे घेत असल्याचे प्रतिज्ञापत्र एसआयटीला दिले आहे. यासंदर्भात एसआयटीने शर्मा हिची चौकशी केली.

मात्र, त्याच्याशी तिचा काहीच संबंध नाही, असे स्पष्ट केले. कायदा पदवीधर असलेल्या संशयित पूजा शर्मा हिने कायद्याच्या भाषेतच पोलिसांच्या प्रश्‍नांना उत्तरे दिली आहेत. त्यामुळे या प्रकरणाचा तपासही पुढे जाण्यास मदत मिळत नाही, असे सूत्रांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

SCROLL FOR NEXT