Goa Assagao House Demolition Case Dainik Gomantak
गोवा

Goa Assagao: ...अखेर पूजा शर्मा चौकशीसाठी गोव्यात

Goa House Demolition Case: गोवा खंडपीठाने चौकशीसाठी क्राईम ब्रँचच्या ‘एसआयटी’समोर हजर राहण्याचे निर्देश दिले होते.

गोमन्तक डिजिटल टीम

आसगाव घर मोडतोड प्रकरणातील मुख्य संशयित पूजा शर्मा हिला सशर्त अटकपूर्व जामीन देताना मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने तिला सोमवार, २२ जुलै रोजी चौकशीसाठी क्राईम ब्रँचच्या ‘एसआयटी’समोर हजर राहण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार ती हजर राहण्यासाठी आज, २१ रोजी गोव्यात दाखल झाली. ती आपल्या वकिलांना घेऊन चौकशीसाठी रायबंदर येथील ‘एसआयटी’च्या कार्यालयात हजर राहण्याची शक्यता आहे.

आगरवाडेकर कुटुंबाने पूजा शर्मा हिच्यासह काही बाऊन्सर्सविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर चौकशीसाठी तिला समन्स बजावले होते. तिने समन्सची तारीख पुढे ढकलण्याची विनंती करूनही ‘एसआयटी’ने त्याची दखल न घेता दुसरे समन्स बजावल्याने तिने सावध भूमिका घेत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला.

सत्र न्यायालयाने तिचा अर्ज फेटाळला. मात्र, उच्च न्यायालयाने तिला दिलासा दिला. उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यासाठी तिला उद्या एसआयटी तपास अधिकाऱ्यांसमोर उपस्थित राहणे सक्तीचे आहे.

तिने ‘एसआयटी’ला काहीच माहिती दिलेली नाही. त्यामुळे ती जरी उद्या उपस्थित राहिली तरी काही दिवस तिला चौकशीसाठी एसआयटी कार्यालयात फेऱ्या माराव्या लागण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

South Africa Bar Shooting: बारमध्ये एन्जॉय करत होते लोक, अचानक अंदाधुंद गोळीबार; 17 जणांचा मृत्यू, 15 जखमी VIDEO

कुणबी साडीवर दावा कुणाचा?

Porvorim Flyover: पर्वरी येथील उड्डाणपुलावर स्पीड कॅमेरे असतानाही उल्लंघन, 10 दिवसांत 580 वाहनांनी ओलांडली वेगमर्यादा

Kushavati Mock Drill: 'कुशावती'त चार ठिकाणी 'मॉक ड्रिल', आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात सराव; प्रशासन तपासणार यंत्रणांची सज्जता

GMC Resident Doctors: निवासी डॉक्टरांसाठी 'गार्ड'ची लढाई, स्टायपेंड वाढीसह 'गोमेकॉ'तील डॉक्टरांच्या प्रश्नांसाठी पाठपुरावा

SCROLL FOR NEXT