Goa Assagao House Demolition Case Canva
गोवा

Assagao Demolition Case : पूजा शर्माला अटकपूर्व जामीन मंजूर

Assagao Demolition Case: पूजा हिला अटक केली, तर तिची ५० हजार रुपयांच्या जामिनावर मुक्तता करावी, असेही न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्जावर दिलेल्या निवाड्यात म्हटले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी, आसगाव येथे घर मोडण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणातील संशयित पूजा शर्मा हिला सोमवारी (ता. २२) गुन्हा अन्वेषण विभागाने स्थापन केलेल्या विशेष तपास पथकासमोर चौकशीसाठी उपस्थित राहावे लागणार आहे.

न्यायालयाने तिला सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

पूजा हिला अटक केली, तर तिची ५० हजार रुपयांच्या जामिनावर मुक्तता करावी, असेही न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्जावर दिलेल्या निवाड्यात म्हटले आहे. आसगाव येथील ६०० चौरस मीटर जमीन पूजा हिने खरेदी केली आहे.

त्या जमिनीत असलेले घर पाडण्याचा तिने प्रयत्न केल्याचा आरोप आहे. प्रदीप यांची पत्नी प्रिंशा हिने आपल्या मुलाचे व पतीचे अपहरण झाले होते. तसेच आपले घर मोडण्याचा प्रयत्न झाला, अशी पोलिस तक्रार केली होती. त्यानंतर ही तक्रार आपल्याला मागे घ्यायची आहे, असे लेखी स्वरूपात तिने पोलिसांना कळवले तरी एफआयआर दाखल झाल्याने न्यायालयाच्या परवानगीविना तपासकाम थांबवणे पोलिसांना शक्य झाले नव्हते.

सरकारने या प्रकरणी तपासकाम सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. पोलिस अटक करतील या भीतीने पूजा हिने जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. तो तेथे नामंजूर झाला.

या निवाड्याला तिने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. सुनावणीदरम्यान पूजाच्या वकिलांनी ती घर पाडण्याचा प्रयत्न झाला, तेव्हा किंवा तत्पूर्वी गोव्यात नव्हती, याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले.

कोठडीची गरज नाही!

या उलट घर पाडले गेल्यास त्याचा फायदा मालमत्ता विकत घेणाऱ्या पूजा हिलाच होणार आहे, असे सरकारी वकिलांनी नमूद केले.

कट कारस्थान करण्यासाठी किंवा त्याच्या अंमलबजावणीसाठी घटनास्थळी प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचीच आवश्यकता नसते, असाही युक्तिवाद या निमित्ताने करण्यात आला. तिच्या कोठडीतील चौकशीही आवश्यकता नाही, या विधानाचा आधार न्यायालयाने घेत अटकपूर्व जामीन मंजूर केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Bike Stunt Video: काळजाचं पाणी करणारा थरारक स्टंट! पठ्ठ्याचा डोकं चक्रावणारा व्हिडिओ व्हायरल; जीवाची लावली बाजी

Shani Gochar 2026: शनिदेव देणार 5 राशींना श्रीमंतीचं वरदान! हाती लागणार कुबेराचा खजिना; करिअरला मिळणार नवा बूस्ट

Colvale Jail Employee Stress: अभद्र युतीमुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा गुदमरतोय जीव! सुधारगृह गुन्हेगारांचा अड्डा; मानसिक आरोग्य कक्ष व छळविरोधी समित्यांची तातडीची मागणी

Crime News: आधी विषारी कोल्ड्रिंक पाजले, मग गळा आवळून केला खून! 20 वर्षांच्या संसारानंतर बायकोनेच नवऱ्याचा काढला काटा; कारण ऐकून व्हाल अवाक

Jitesh Kamat Colvale Jai: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाची सद्यस्थिती पाहता, 'गुन्हेगारांना आलिशान सुविधा पुरवणारे हॉलिडे होम' - जितेश कामत

SCROLL FOR NEXT