CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Mhaje Ghar: ‘माझे घर’ला का विरोध केला हे विरोधकांना विचारा! CM सावंतांचे सांगेवासीयांना आवाहन

CM Pramod Sawant: लोकांची घरे पाडण्याच्या घटना घडत होत्या व अशा घरांवर कारवाई होऊ नये म्हणून आम्ही माझे घर ही योजना आणली असल्याचे सावंत यांनी सांगितले.

गोमन्तक डिजिटल टीम

केपे: राज्यातील लोकांची घरे कायदेशीर करण्यासाठी आमच्या सरकारने जो कायदा विधानसभेत चर्चेला आणला, त्याला काँग्रेस तसेच इतर विरोधी पक्षांनी विधानसभेत जोरदार विरोध केला होता. विधानसभेसाठी तुमची मते मागायला तुमच्या घरी येतील, तेव्हा त्यांना या योजनेला का विरोध केला होता, हा प्रश्न विचारावा, असे आवाहन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले.

सांगे येथे आयोजित ‘माझे घर’ साठी अर्ज वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई, दक्षिण गोवा जिल्हाधिकारी इग्ना क्लिटस, नगराध्यक्षा संतीक्षा गडकर व इतर मान्यवर उपस्थित होते.

राज्यात बऱ्याच गावात लोकांची घरे कायदेशीर नसल्याने त्या घरावर कायदेशीर कारवाई करून सामान्य लोकांची घरे पाडण्याच्या घटना घडत होत्या व अशा घरांवर कारवाई होऊ नये म्हणून आम्ही माझे घर ही योजना आणली असल्याचे सावंत यांनी सांगितले.

जास्तीत जास्त लोकांची घरे बऱ्याच वर्ष्यापासून कोमुनिदाद, जमीन मालक, सोशियदाद, वीस कलमी किंवा सरकारी जागेत बांधली गेली असल्याने ही घरे बेकायदेशीर होती व बऱ्याच ठिकाणी अशा घरावर जमीन मालक किंवा इतर लोक कायदेशीर कारवाई करून सदर घरे जमीनदोस्त करण्याची धमकी लोकांना देत होते व अशा लोकांचे त्रास आमच्या सरकारने जाणून ही महत्वाची योजना आम्ही मार्गी लावली असल्याचे त्यांनी सांगितले.

आमचे सरकार सामान्य लोकांसाठी काम करीत असून आता यापुढे लोकांना त्यांच्या घराचा मालकी हक्क मिळणार असल्याने कोणीही त्यांचे घर पाडू शकणार नसल्याचे त्यांनी सांगितले. विरोधी पक्षाला सामान्य जनतेचे काहीच पडून गेलेले नाही हे त्यांनी ‘माझे घर’ योजनेला केलेल्या विरोधवरून दिसून आले आहे, असे सुभाष फळदेसाई यांनी सांगितले.

सहा महिन्यांत हक्काचे घर!

सांगे मतदारसंघात जास्तीत जास्त लोकांची घरे सरकारी जमिनीत असून आता या योजनेमुळे या लोकांना आता त्यांना आपल्या घराचा कायदेशीर हक्क मिळणार आहे. येत्या सहा महिन्यांत ही योजना पूर्णपणे मार्गी लावून लोकांना त्यांचा हक्काचे घर मिळणार असून या सहा महिन्यांत मतदारसंघातील प्रत्येक पंचायतीत जाऊन सदर पंचायत क्षेत्रातील लोकांचे अर्ज भरून योग्य ती कागदपत्रे तपासून स्वीकारण्यात येणार आहेत, असे समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT