Fishing boat Dainik Gomantak
गोवा

LED Fishing: एलईडी मासेमारीचा विषय केंद्र सरकार दरबारी मांडावा, मच्छिमारांची मागणी

एलईडी मासेमारी सुरू करण्यासाठी केंद्राकडूनच परवानगी घ्यावी लागेल, मत्स्य व्यवसाय मंत्री निलकंठ हर्णळकर यांची माहिती.

गोमन्तक डिजिटल टीम

गोव्यात एलईडी मासेमारीला (LED Fishing) बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान, मच्छिमारांकडून एलईडी मासेमारीसाठी परवानगी घ्यावी अशी मागणी केली जात आहे. त्यावर मत्स्य व्यवसाय मंत्री निलकंठ हर्णळकर (Fisheries minister Nilkanth Halarnkar) स्षष्टीकरण दिले असून, केंद्र सरकारकडूनच एलईडी मासेमारीला बंदी घातली आहे. पुन्हा एलईडी मासेमारी सुरू करण्यासाठी केंद्राकडूनच परवानगी घ्यावी लागेल. असे हर्णळकर यांनी म्हटले आहे.

मच्छिमार व्यावसायिकांनी मंगळवारी (दि.16) निलकंठ हर्णळकर यांची भेट घेतली. सरकारने गोव्यात एलईडी मासेमारीसाठी विरोधात कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. इतर देशांमध्ये एलईडी फिशिंग केले जात असून, ठराविक नॉटिकल माईलच्या वरती एलईडी फिशिंग केल्यास मासळीच्या उत्पत्तीवर परिणाम होत नाही. त्यामुळे एलईडी मासेमारीला परवानगी देण्यात यावी अशी मागणी व्यावसायिकांनी केली. केंद्र सरकार दरबारी हा विषय मांडावा अशी मागणी त्यांनी केली.

दरम्यान, मागील आठवड्यात हर्णळकर यांनी समुद्रात जाणाऱ्या प्रत्येक बोटीची तपासणी केली जाणार आहे अशी माहिती दिली. कोणत्याही ट्रॉलर्समध्ये एलईडी आढल्यास त्याच्यावर गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT