Ashadhi Ekadashi 2023 Dainik Gomantak
गोवा

Ashadhi Ekadashi 2023 : सावर्डे येथील सरकारी माध्यमिक विद्यालयातर्फे गटवार दिंडी स्पर्धेचे आयोजन

नाट्यकला शिक्षक प्रमोद म्हाडेश्वर यांच्या उपस्थितीत शिक्षकांनी वारीची सुरुवात केली.

गोमन्तक डिजिटल टीम

Valpoi : सावर्डे येथील सरकारी माध्यमिक विद्यालयातर्फे 8 वी व 9 वी साठी संतांची माहिती या विषयावर भित्तीपत्रक स्पर्धा तसेच इ. 5 वी ते 7 वीच्या विद्यार्थ्यांसाठी आषाढी एकादशीनिमित्त गटवार दिंडी स्पर्धा आयोजित केली होती. सकाळी ज्येष्ठ शिक्षक संतोष बर्वे यांनी आषाढी वारीची परंपरा व उपवासाचे महत्त्व सांगितले. नाट्यकला शिक्षक प्रमोद म्हाडेश्वर यांच्या उपस्थितीत शिक्षकांनी वारीची सुरुवात केली.

विठ्ठलाच्या गजरात सावर्डे परिसर दुमदुमून सोडला. गावात दिंडी फिरून आल्यानंतर विद्यार्थ्यांना माध्यान्ह आहार देण्यात आला.यावेळी सर्व शिक्षकांनी उपवासाचे पदार्थ आणून शाळेत एकादशी साजरी केली. दिंडी मार्गस्थ झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी शाळेत भित्तीपत्रके लिहून तयार केली.

दोन्ही स्पर्धांचे परीक्षण शारीरिक शिक्षक विश्वजीत फडते गावकर व नाट्यकला शिक्षक प्रमोद म्हाडेश्वर यांनी केले. दोन्ही स्पर्धांचे आयोजन मुख्याध्यापिका सारिका नाईक, सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख विनोदिता गावडे यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT