Crime News  Dainik Gomantak
गोवा

Vasco Crime: खूनाचे गूढ उलगडेना! वास्को पोलिसांसमोर उभे ठाकले मोठे आव्हान

Vasco Police: गायत्री यांचा गळा आवळून आणि नंतर गळ्यावर धारदार शस्त्राने वार केल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे शवचिकित्सा अहवालात नमूद केले आहे.

Manish Jadhav

Vasco Crime: पिशेडोंगरी-खारीवाडा येथील ७९ वर्षीय गायत्री मराठे यांच्या खुनाच्या घटनेला 48 तास उलटले तरी तिच्या खुन्याचा तपास लागत नसल्याने वास्को पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. गायत्री यांचा गळा आवळून आणि नंतर गळ्यावर धारदार शस्त्राने वार केल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे शवचिकित्सा अहवालात नमूद केले आहे.

पोलिस याप्रकरणी गतीने तपास करत असल्याचे वास्कोचे पोलिस निरीक्षक कपिल नायक यांनी सांगितले. गायत्री मराठे यांच्या पतीचा काही वर्षांपूर्वी मृत्यू झाला असून तेव्हापासून त्या घरात एकट्याच राहायच्या. अधूनमधून शेजारी गायत्री यांची विचारपूस करायचे. ज्यादिवशी त्यांचा खून झाला, तेव्हा त्या एकट्याच घरात होत्या, असे सांगण्यात आले. गायत्री यांचा खून का केला, याविषयी पोलिस तपास करत आहेत. हा खून चोरीच्या उद्देशाने केला नसल्याचे पोलिस तपासात आढळून आले आहे. कारण त्यांच्या अंगावरील दागिने जसेच्या तसेच होते. ते दागिने काढण्याचा प्रयत्नसुद्धा झाला नाही. तसेच त्यांच्या घरातील इतर वस्तूंचीही चोरी झाली नाही. त्यामुळे पोलिसही चक्रावले असून विविध मार्गांनी या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

कुणाशी वैरही नव्हते!

गायत्री मराठे यांच्या शेजाऱ्यांकडे याप्रकरणी विचारपूस केली असता, त्यांच्या पतीचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले होते. तेव्हापासून त्या घरात एकट्याच राहात होत्या. त्यांचा कुणाशी वाद, वैर वगैरे नव्हते. मग या वृद्ध महिलेचा खून करण्यामागे खुन्याचा उद्देश काय, असा प्रश्न शेजाऱ्यांना पडला आहे. पोलिस तपास सुरू असून लवकरच या प्रकरणाचा उलगडा होईल, असा विश्वास पोलिस निरीक्षक कपिल नायक यांनी व्यक्त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

Goa Agriculture: कोकमला अवकाळी पावसाचा फटका, लागवड क्षेत्रात सातत्याने वाढ; हवामान बदलाने उत्पादनात चढ-उतार

Goa Weather: गोव्यात उन्हाचा तडाखा अन् सत्तरी-साखळीत वादळी पाऊस; पुढील 4-5 दिवस उष्मा कायम राहणार

Tourist Safety: दलालांवर 'ड्रोन'ची नजर, एआयने आवळणार फास; 'बीच व्हिजिल ॲप'ही होणार अपग्रेडच, पर्यटनमंत्र्यांची माहिती

SCROLL FOR NEXT