Goa Assembly Monsoon Session Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly Budget Session : चार दिवसीय अधिवेशनात तब्बल 803 प्रश्‍न; 28 मार्चला अर्थसंकल्प

सरकारला घेरण्याची विरोधकांची तयारी पूर्ण

दैनिक गोमन्तक डिजिटल

महिनाअखेरीस होत असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारला घेरण्यासाठी विरोधकांनी जोरदार तयारी केली आहे. चार दिवसांच्या अधिवेशनात आमदारांकडून तब्बल 803 प्रश्‍न विचारण्यात येणार आहेत.

अधिवेशनात विरोधी पक्ष एकत्रित दिसतील. आम्ही जनतेच्या विविध प्रश्‍नांना अधिवेशनात वाचा फोडू, असे विरोधी नेत्यांनी सांगितले. 27 मार्चपासून सुरू होणारे विधानसभा अधिवेशन 31 मार्चपर्यंत असे 5 दिवस चालेल, असे जाहीर केले होते.

30 तारखेला रामनवमी असल्याने त्या दिवशी अधिवेशन होणार नाही, असे सभापती कार्यालयाकडून जाहीर झालेले आहे. अगोदरच पाच दिवसांचे अधिवेशन आणि त्यात सुट्टी यामुळे वैतागलेल्या विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.

तरीही विरोधी पक्ष या नात्याने जनतेच्या जास्तीत जास्त प्रश्‍नांना विधानसभा दालनात वाचा फोडू, असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.

207 तारांकित, 596 अतारांकित

केवळ 4 दिवसांचे अधिवेशन असले तरी विरोधकांनी सरकारला घेरण्यासाठीची पुरेपूर तयारी केलेली आहे. या 4 दिवसांमध्ये विधानसभा सदस्यांकडून 207 तारांकित आणि 596 अतारांकित, असे तब्बल 803 प्रश्‍न विधानसभेत सरकारला विचारण्यात आले आहेत.

यावरून विरोधी पक्षांची तयारी दिसते. यातील काही प्रश्‍न एकत्र क्लब करून विचारण्यात आले आहेत, अशी माहिती विरोधी आमदारांनी दिली आहे.

20 रोजी निर्णय

हे अर्थसंकल्पी अधिवेशन असून यापूर्वी ठरल्याप्रमाणे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत अर्थमंत्री या नात्याने पहिल्या दिवशी 27 मार्चला अर्थसंकल्प सादर करतील, अशी अपेक्षा होती.

मात्र, हा अर्थसंकल्प 28 तारखेला सादर होण्याची शक्यता आहे. यावर 20 मार्च रोजी होणाऱ्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये अंतिम निर्णय होणार आहे, असे विधानसभा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT