Arvind Kejriwal Dainik Gomantak
गोवा

'आप'चा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा आज ठरणार

आपचे पक्षप्रमुख अरविंद केजरीवाल गोव्यात दाखल, मोठ्या घोषणेची शक्यता

दैनिक गोमन्तक

पणजी : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादर करण्याची प्रक्रिया सुरू होण्यास एकच दिवस बाकी आहे. आम आदमी पक्षाने साखळीमधून मुख्यमंत्र्यांविरोधात मनोज घाडी आमोणकर यांना रिंगणात उतरवले आहे. दरम्यान पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल हे संध्याकाळी गोव्यात दाखल झाले आहेत. केजरीवाल आज बुधवारी मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्याची शक्यता आहे. (Arvind Kejriwal News Updates)

अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी गोव्यात पक्षाचा ठसा उमटविण्यासाठी जोरदार प्रयत्न केले आहेत. त्यामुळे ते वारंवार गोवा दौरा करत आहेत. लोकांना विविध योजना देण्याचे आश्‍वासने दिली आहेत. ते मंगळवारी संध्याकाळी गोव्यात आले. बुधवारी ते गोवा विधानसभा निवडणुकीच्या (Goa Assembly Elections) पार्श्वभूमीवर मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराची मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. त्यांनी यापूर्वी गोव्याला भंडारी समाजाचा मुख्यमंत्री तसेच ख्रिस्ती समाजातील उपमुख्यमंत्री देण्याचे आश्‍वासन दिले होते.

आम आदमी पार्टीचे (Aam Aadmi Party) प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी गोवा विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी मोफत वीज आणि पाणी देण्यासोबतच 13 कलमी अजेंडा तयार केला आहे. या अजेंड्यात राज्यातील शिक्षण, आरोग्य, उद्योग आणि व्यापार, रोजगार, खाणकाम आणि पायाभूत सुविधांचा विकास यांचा समावेश आहे. तसेच आपल्या निवडणूक कार्यक्रमात, AAP ने राज्यातील लोकांना दरमहा 3000 रुपये बेरोजगार भत्ता देण्याचे आश्वासन केजरीवालांनी दिले आहे. याशिवाय जमिनीचे हक्क देण्याचे आश्वासनही आम आदमी पक्षाने दिले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT