गोवा

Artist in Goa: बँजोवादनाकडून ‘बुरुड’ व्यवसायाकडे; कोरोना’मुळे कळले कलेचे महत्त्व

Goa: कोरोना महामारीतील मोठ्या उलाढालींनंतर पारंपरिक व्यवसायापासून दूर झालेले काहीजण पुन्हा आपल्या व्यवसायाकडे वळले.

दैनिक गोमन्तक

Goa: कोरोना महामारीच्या काळातील टाळेबंदीनंतर अनेक पारंपरिक व्यवसायांवर संक्रांत आली. कुटुंबाचा चरितार्थ किंवा आर्थिक कमाईचे साधन म्हणा, अनेकांनी भाजी, फळ विक्री आदी मिळेल तो व्यवसाय सुरू केला. मात्र, पूर्वी बँजोवादन व्यवसायात झोकून दिलेले संजय जाधव हे कोरोना महामारीनंतर आपल्या पारंपरिक बुरुड व्यवसायाकडे वळले आहेत.

कोरोना महामारीतील मोठ्या उलाढालींनंतर पारंपरिक व्यवसायापासून दूर झालेले काहीजण पुन्हा आपल्या व्यवसायाकडे वळले. याचेच उदाहरण सध्या मुस्लिमवाडा-डिचोली येथे अनुभवायला मिळते.

डिचोली-साखळी रस्त्याच्या बाजूला एक गृहस्थ चक्क बुरुड साहित्य बनविण्याचा व्यवसाय करत आहेत. हे गृहस्थ म्हणजेच संजय जाधव. एखादी पारंपरिक कला अवगत असेल, तर संकटाच्या वेळी त्याचा कसा उपयोग होऊ शकतो, त्याचे उदाहरण म्हणून संजय जाधव यांच्याकडे पाहता येईल.

संजय जाधव हे मूळचे महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील. 30 वर्षांपूर्वी जाधव यांचे कुटुंब डिचोलीत स्थायिक झाले. त्यावेळी संजय दोन ते तीन वर्षांचे असावेत. त्यावेळी त्यांचे वडील आणि आजोबा पारंपरिक बुरुड व्यवसाय करत. साधारण वीस वर्षांचे असताना संजय जाधव हे पारंपरिक बुरुड व्यवसायाऐवजी बँडवादनाकडे वळले.

लग्न, आदी समारंभांना आमंत्रणे मिळू लागल्याने या व्यवसायात त्यांचा उत्साह वाढला. हळूहळू त्यांनी या व्यवसायात झोकून दिले आणि बँजो ग्रुप तयार केला. दोन वर्षांपूर्वी कोरोना महामारी वाढल्यानंतर टाळेबंदीचा काळ आला.

टाळेबंदीत अनेक व्यवसाय ठप्प झाले. लग्नसोहळे आदी शुभकार्यांवर निर्बंध आले. त्यामुळे बँजो, बँडवादनावर संक्रांत आली. अशा संकट काळात संजय यांच्यासमोर आर्थिक कमाईचा गंभीर प्रश्न निर्माण झाला. अखेर त्यांनी वडिलोपार्जित बुरुड व्यवसायात लक्ष घातले. सध्या बुरूड कलेतून तयार केलेल्या वस्तूंना बरीच मागणी असून त्यांनी स्वत: तयार केलेल्या विविध गृहोपयोगी वस्तू आकर्षक आहेत.

कोरोनाने मारले, बुरुड व्यवसायाने तारले

कोरोना महामारीत खरे तर बुरुड व्यवसायानेच आम्हाला तारले. त्यामुळे या व्यवसायापासून आता दूर होण्यास मन होत नाही. बुरुड साहित्याला मागणी असल्याने हा व्यवसाय आर्थिक कमाईचे जोड साधन बनले आहे. बँजोला आमंत्रण नसले, की बुरुड साहित्य तयार करण्यात मी वेळ घालवत आहे. याकामी मला पत्नी मदत करते. पारंपरिक कलेचा आता मला फायदा झाला आहे, असे संजय जाधव म्हणाले.

मुस्लिमवाडा परिसरात रस्त्याच्या बाजूने बसून त्यांनी बांबूच्या बेतापासून बुरुड साहित्य बनविण्यास प्रारंभ केला. कोरोना महामारीचा धोका कमी झाल्यानंतर लग्न सोहळे, शुभकार्ये आदी समारंभांवरील निर्बंध मागे घेतले.

हळूहळू पारंपरिक व्यवसाय आदी व्यवहार पूर्वपदावर आले. आता संजय जाधव यांच्या बँजोवादन ग्रुपला पूर्वीप्रमाणे आमंत्रणे येऊ लागली आहेत. मात्र, पर्याय आणि गरज म्हणून सुरू केलेला बुरुड व्यवसाय जाधव यांनी बंद केलेला नाही. आजही बुरुड साहित्याला मोठी मागणी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

SCROLL FOR NEXT