Article 370 Dainik Gomantak
गोवा

Article 370 : ‘आर्टिकल ३७०’ आजपासून भारतभर प्रदर्शित

Article 370 : या चित्रपटात यामी गौतमी तसेच इतर मोठे कलाकार भूमिका साकारत असून काश्मीरमधील कलम ३७० लागू करतेवेळी तेथील स्थिती तसेच इतर बाबींवर या चित्रपटात प्रकाश टाकण्यात आला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Article 370 :

फोंडा, एका गोमंतकीय युवकाने दिग्दर्शित केलेला मोठ्या पडद्यावरील आणि काश्मीरमधील संवेदनशील विषय यशस्वीपणे हाताळलेला ‘आर्टिकल ३७०‘ हा चित्रपट शुक्रवारी २३ तारखेपासून भारतभर प्रदर्शित होत आहे.

या चित्रपटातून गोमंतकीय युवकाने आपले कलाकौशल्य सिद्ध केल्याचे अथश्री या फोंड्यातील संस्थेच्या सदस्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

यावेळी अथश्रीचे संतोष देसाई, दिलीप देसाई, राजेंद्र देसाई, रघुनाथ साकोर्डेकर व जयंत मिरिंगकर आदी मान्यवर उपस्थित होते. गोमंतकीय प्रतिभाशाली युवक आदित्य जांभळे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

या चित्रपटात यामी गौतमी तसेच इतर मोठे कलाकार भूमिका साकारत असून काश्मीरमधील कलम ३७० लागू करतेवेळी तेथील स्थिती तसेच इतर बाबींवर या चित्रपटात प्रकाश टाकण्यात आला आहे.

आदित्य जांभळे यांनी आतापर्यंत अनेक नाटके तसेच चित्रपटांना दिग्दर्शन दिले असून मोठ्या पडद्यावर प्रथमच त्यांनी चित्रपट दिग्दर्शित करण्याचे यशस्वी प्रयत्न केले असून या चित्रपटाची खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Samuel Braganza Case: सॅम्युअल मृत्यूप्रकरणी गोपनीय अहवाल सादर, प्रकरणाला निर्णायक वळण; दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार

Cricketer Suicide: 'माझी संघात निवड झाली नाही...'; सुसाइड नोट लिहून क्रिकेटपटूची आत्महत्या, क्रीडाविश्वात हळहळ

Bhiwandi Building Collapse: 'जीव वाचवण्यासाठी पहिल्या मजल्यावरून उडी मारली'; भिवंडी दुर्घटनेत बचावलेल्यांनी सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव VIDEO

Salaulim Dam: साळावली धरण अखेर 'ओव्‍हरफ्‍लो', यंदा तब्‍बल 35 दिवसांचा विलंब; पर्यटकांसाठी निसर्गाचा आकर्षक नजराणा

Rohit Sharma Message Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीनंतर रोहित शर्माची भावनिक पोस्ट; म्हणाला, "अनेक वर्षे एकाच ड्रेसिंग रूममध्ये..."

SCROLL FOR NEXT