colvale police Arrested Accused Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News: फ्लाइटमध्ये झाली ओळख, गोव्यातील हॉटेलमध्ये तरुणीवर बलात्कार; गुजरातच्या पर्यटकाला अटक

कोलवाळ पोलिसांनी ही कारवाई केली.

Rajat Sawant

Man From Gujarat forcefully Rape On Girl: एका युवतीला हॉटेलवर बोलावून तिच्यावर बलात्कार करुन धमकी दिल्या प्रकरणी कोलवाळ पोलिसांनी एका गुजराती व्यक्तीला अटक केली आहे. संशयिताची व पिडीत युवतीची ओळख फ्लाइटमध्ये प्रवास करत असताना झाली होती. पोलिस पुढील तपास करीत आहेत.

कोलवाळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याबाबतची तक्रार 23 वर्षीय पिडीत युवतीने कोलवाळ पोलिसांत दिली होती. तक्रारीत असे नमुद करण्यात आले आहे की, संशयित व युवती फ्लाइटमध्ये एकत्र प्रवास करत होते. यावेळी त्यांची ओळख झाली. संशयिताने नंतर तिच्याशी मैत्री केली आणि तिचा फोन नंबर घेतला.

युवती गोव्यात असताना संशयितही गोव्यातच होता. संशयित अस्नोडा येथील एका तारांकीत हॉटेलमध्ये उतरला होता. हॉटेलमधील सुविधा दाखवण्याच्या बहाण्याने संशयिताने पिडीत युवतीला कॉल करुन हॉटेलमध्ये बोलाविले.

युवतीच्या एकटेपणाचा फायदा घेत संशयिताने तिला आपल्या रिसॉर्टच्या खोलीत नेऊन जबरदस्तीने बलात्कार केला आणि पुढे ही गोष्ट कोणाला सांगू नकोस, अशी धमकी दिली असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

याबाबतची तक्रार दाखल होताच कोलवाळ पोलिसांनी संशयिताचा शोध घेण्यास सुरुवात केली. मोबाईल लोकेशनवरून संशयित रिसॉर्ट सोडून पणजी परिसरात फिरत असल्याचे कळले. पथकाने पणजी परिसरात त्याचा शोध सुरू केला.

यानंतर संशयित म्हापशाच्या दिशेने जात असल्याचे आढळून आले. अखेर थिवी परिसरात लक्ष्मणभाई शियार (45, रा. गुजरात) या संशयिताला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले.

उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक निधीन वाल्सन व म्हापसा एसडीपीओ जिवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली कोलवाळ स्थानकाचे पीआय विजय राणे, एलपीएसआय सोनम वेरेणकर, पीएसआय रोहन मडगावकर, हेड कॉन्स्टेबल रुपेश, पोलिस कॉन्स्टेबल सुलेश, अजय यांच्या टीमने ही कारवाई केली.

प्रकरणाचा अधिक तपास एलपीएसआय सोनम वेरेणकर करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT