Goa Pradesh Mahila Congress  Dainik Gomantak
गोवा

Brij Bhushan: बृजभूषण यांना तात्काळ अटक करा ; गोवा प्रदेश महिला काँग्रेसची मागणी

बृजभूषण शरण सिंह यांच्यावर कुस्तीपटूंचा लैंगिक छळ केल्याचा आरोप असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली.

Pramod Yadav

Arrest Brij Bhushan immediately Goa Pradesh Mahila Congress: लैंगिक छळाचे आरोप असलेल्या खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्यावर कारवाई करून क्रीडा क्षेत्र पवित्र करावे, अशी मागणी गोवा प्रदेश महिला काँग्रेसने गुरुवारी केली.

पत्रकार परिषदेला संबोधित करताना महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा बीना नाईक यांनी सिंह यांना अभय दिल्याबद्दल भाजप सरकारवर टीका केली.

यावेळी उपाध्यक्ष रोशन देसाई, दक्षिण जिल्हाध्यक्ष कार्मेलिना वास आणि कुंभारजुवा गटाध्यक्ष जेनिफर फर्नांडिस उपस्थित होते.

बीना नाईक यांनी भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्यावर कुस्तीपटूंचा लैंगिक छळ केल्याचा आरोप असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली.

कुस्तीपटू बजरंग पुनिया, ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता साक्षी मलिक आणि इतर जे दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन करत आहेत त्यांना भाजप सरकारने वाईट वागणूक दिली. असा आरोप बीना नाईक यांनी केला आहे. आरोपीवर कारवाई न झाल्यास क्रीडा उपक्रमांचे भवितव्य अंधकारमय होईल, असेही त्या म्हणाल्या.

"ज्या दिवशी या कुस्तीपटूंनी गंगा नदीत पदक टाकायचे ठरवले, तेव्हा त्यांना पोलिसांनी ओढले आणि मारहाण केली. दुसरीकडे मोदी सरकारने आरोपीला व्हीआयपी ट्रीटमेंट दिली. ही लोकशाही आहे का?" असा सवाल नाईक यांनी उपस्थित केला.

नाईक यांनी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि मीनाक्षी लेखी यांच्या मौनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. "या महिला मंत्री आज गप्प का आहेत. मंत्री होण्यापूर्वी ते महिलांच्या सुरक्षेबद्दल बोलत असत, आता त्यांची चिंता कुठे गायब झाली," असा सवाल त्यांनी केला.

"नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा आरोपीला घाबरतात हे उघड आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होत नाही. अन्यथा त्यांनी वास्तव जनतेला सांगावे." असेही नाईक म्हणाल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Election 2027: निवडणुकीच्या तोंडावर भाजपचा 'मास्टरस्ट्रोक'; अधिकाधिक महिलांना उमेदवारी देण्याचा निर्णय, विधानसभेत महिला संख्या वाढवणार

Goa Crime: ऐन सणासुदीत राज्यात घरफोड्या अन् सायबर फसवणुकीचे सत्र! तोरसे, दवर्लीत चोरट्यांचा धुमाकूळ; बँकेला 75 लाखांचा चुना

डिचोली तालुक्यात झेंडूचे मळे केशरी-पिवळ्या फुलांनी बहरले, कृषी खात्याच्या ‘आत्मा’ योजनेला मोठे यश; शेतकऱ्यांच्या मेहनतीला दसऱ्याचे फळ

Asian Para Games 2026: आशियाई पॅरा गेम्समध्ये भारतीय खेळाडूंची धमाकेदार सुरुवात! 10 मीटर एअर रायफलमध्ये मोना अग्रवालला 'गोल्ड', तर अवनी लेखराला 'सिल्व्हर'

Goa Mining: 'गाव नष्ट होऊ देणार नाही!' होंडा ग्रामसभेत 'सोलये' खाणीचा प्रश्न ऐरणीवर; एनओसी रोखण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार

SCROLL FOR NEXT