Saurabh Luthra Dainik Gomantak
गोवा

Arpora Nightclub Fire Case: फरार क्लब मालकांचा खेळ खल्लास! लुथरा बंधू लवकरच गोवा पोलिसांच्या ताब्यात; चौकशीत महत्त्‍वपूर्ण माहिती हाती आल्‍याची चर्चा

Luthra Brothers Arrested: हडफडे आग दुर्घटनाप्रकरणी नाईट क्‍लबचे फरार मालक सौरभ व गौरव लुथरा हे बंधू गोवा पोलिसांच्या कोठडीत येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

म्हापसा: हडफडे आग दुर्घटनाप्रकरणी नाईट क्‍लबचे फरार मालक सौरभ व गौरव लुथरा हे बंधू गोवा पोलिसांच्या कोठडीत येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. फुकेत-थायलंड येथे तेथील पोलिसांनी त्यांना पकडल्यानंतर सीबीआयचे पथक त्यांना घेऊन फुकेतवरून दिल्लीला येण्यास निघाले आहे.

इंटरपोलची नोटीस आणि भारत सरकारने पासपोर्ट निलंबित केल्यानंतर थायलंड पोलिसांनी लुथरा बंधूंना फुकेतमध्ये ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना आणण्यासाठी सीबीआयचे पथक फुकेत येथे रवाना झाले होते. त्यांनी तेथे त्यांची प्राथमिक चौकशी केली आहे. या दरम्यानही काही माहिती समोर आल्याची चर्चा आहे. दिल्लीत (Delhi) पोचल्यानंतर संबंधित प्रक्रिया पूर्ण केल्यावर त्यांना गोवा पोलिसांच्या ताब्यात दिले जाईल. दरम्यान, लुथरा बंधूंचा को-पार्टनर तथा क्लबचा भागीदार अजय गुप्ता याला म्हापसा न्यायालयाने ७ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

हडफडे येथील ‘बर्च बाय रोमिओ लेन’ क्लबला लागलेल्या भीषण आगीत २५ निष्‍पाप लोकांना आपला प्राण गमवावा लागला आहे. आग लागताच काही तासांतच लुथरा बंधू थायलंडला पसार झाले होते. गोवा पोलिसांनी केंद्र सरकारशी पत्रव्यवहार करून त्‍यांचे पासपोर्ट निलंबित केले होते. आज गुरुवारी त्यांना थायलंड पोलिसांनी ताब्यात घेतले. गोवा पोलिसांच्या विनंतीनंतर इंटरपोलने लुथरा बंधूंविरोधात ‘ब्ल्यू कॉर्नर’ नोटीस जारी केली होती.

दरम्यान, गुरुवारी संशयित अजय गुप्ता याच्या वकिलांनी म्हापसा न्यायालयासमोर युक्तिवाद केला की, गुप्ता हे तपास यंत्रणांना चौकशीत पूर्णतः सहकार्य करत आहेत. त्‍यांना पाठीच्या कण्याची दुखापत असून वैद्यकीय आधारावर त्यांनी रवानगी कोठडीत करू नये. परंतु गुप्ता हे कोठडीसाठी वैद्यकीयदृष्ट्या फिट असल्याचे डॉक्टरांचे प्रमाणपत्र पोलिसांनी न्‍यायालयाला सादर केल्याने त्‍याला पोलिस कोठडी सुनावण्यात आली. न्यायालयाने पोलिसांना सूचित केले की, गुप्ता याला डॉक्टरांनी लिहून दिलेली सर्व औषधे पुरवावीत.

लुथरा बंधूंना अटकपूर्व जामीन नाकारला

फरार संशयित सौरभ व गौरव लुथरा या बंधूंनी दिल्लीतील रोहिणी न्यायालयात ट्रॉन्झिट अँटिसिपेटरी बेल (अटकपूर्व जामीन) याचिका दाखल करून चार आठवड्यांचे अटकपूर्व संरक्षण तसेच देशात परतल्यानंतर तातडीने अटक होऊ नये अशी मागणी केली होती. या याचिकेला गोवा (Goa) सरकारने विरोध करताना म्‍हटले होते की, लुथरा बंधूंनी जाणीवपूर्वक चौकशीपासून पळ काढला. त्यामुळे संशयितांना अंतरिम संरक्षण देऊ नये. ती मान्य करत न्यायालयाने त्यांना अटकपूर्व जामीन नाकारला आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

विदेश व्यवहार मंत्रालय व केंद्रीय गृह मंत्रालयाने तत्काळ दिलेल्या प्रतिसादामुळे लुथरा बंधूंना पकडता आले. त्यांना आणण्यासाठी गोवा पोलिसांचे पथक केंद्रीय यंत्रणांच्या पथकासोबत थायलंडला रवाना होईल. तपास गतीने पुढे सरकत आहे. कोणाचीही गय केली जाणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

America New Visa Policy: ऑनलाईन फ्रॉड अन् सेक्सटॉर्शन करणाऱ्यांना झटका! अमेरिकन नागरिकांना लुटणाऱ्या चिनी गँगवर निशाण्यावर; ट्रम्प सरकारची नवी व्हिसा पॉलिसी जाहीर

Weather Update: राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम! IMD कडून 31 जुलैपर्यंत 'यलो अलर्ट'; मुसळधार सरींचा अंदाज

CJP Protest Violence: 'सीजेपी' आंदोलनातील हिंसेमागे पाकिस्तान कनेक्शन! दंगल घडवण्यासाठी भामट्यांनी वापरले 'ब्लूटूथ ॲप्स'; पोलिस तपासात हायटेक नेटवर्क उघड

Who is Samreen Kaur: टीम इंडियाचा मॅचविनर 'समरीन'च्या प्रेमात क्लिन बोल्ड! गर्लफ्रेंडसोबतचा रोमँटिक फोटो शेअर; पाहा कोण आहे ती?

CJP Protest: "शांततापूर्ण आंदोलन हा घटनात्मक अधिकार!" विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज पोलिसांना नडला; दडपशाही रोखण्यासाठी सुप्रीम कोर्टाचा मास्टरप्लॅन

SCROLL FOR NEXT