Pharma Worker Protest At Azad Maidan, Panaji Goa Dainik Gomantak
गोवा

वेर्णा येथील सिप्लाविरोधात कर्मचारी रस्त्यावर, कंपनीकडून सतावणूक होत असल्याचा आरोप

Verna IDC: पणजीतील आझाद मैदानावर सिप्ला कंपनीच्या सुमारे तीनशे कामगारांनी एकत्र येत निषेध आंदोलन केलं.

Pramod Yadav

वेर्णा येथील औद्योगिक परिसरात असलेल्या सिप्ला कंपनीत महाराष्ट्रातील दोन कर्मचाऱ्यांचा अपघाती मृत्यू झाला. याप्रकरणी कंपनी वादाच्या भोवऱ्यात सापडली असताना आता कर्मचाऱ्यांनी कंपनीवर सतावणुकीचा आरोप केला आहे. शनिवारी (दि. २७ जुलै) पणजीतील आझाद मैदानावर कर्मचाऱ्यांनी निषेध आंदोलन करत कंपनीविरोधात घोषणाबाजी केली.

पणजीतील आझाद मैदानावर सिप्ला कंपनीच्या सुमारे तीनशे कामगारांनी एकत्र येत निषेध आंदोलन केलं. गेल्या दोन वर्षापासून कंपनी सतावणूक करत असल्याचा आरोप कामगारांनी केला. कोणत्याही प्रकारची पूर्वकल्पना न देता आसाम, सिक्कीम सारख्या राज्यात कर्मचाऱ्यांची बदली केली जात असून, हे प्रकार थांबले पाहिजेत, अशी मागणी आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांनी केली.

कर्मचाऱ्यांनी बदली दूरच्या राज्यात केली जात असल्याबाबतचा मुद्दा आमदार विजय सरदेसाई शुक्रवारी अधिवेशनात उपस्थित केला होता. एका कर्मचाऱ्यांने पत्र लिहून त्यांना याबाबत माहिती दिल्याचा उल्लेख सरदेसाईंनी सभागृहात केला होता.

कर्मचाऱ्यांना पूर्वकल्पना न देता अशाप्रकारे परराज्यात बदली केली जात असल्याचे प्रकार कंपनी करत असल्याचे सरदेसाईंनी सभागृहात सांगितले.

भारतीय कामगार सेनेने देखील हा मुद्दा उचलून धरला आहे. काही दिवसांपूर्वी सेनेच्या रघुनाथ कुचिक यांच्यावतीने फार्मा क्षेत्रासाठी गोवा सरकारने लावलेला एस्मा मागे घेण्याची विनंती करणारे निवेदन कामगार उपायुक्तांना देण्यात आले.

महाराष्ट्रातील दोन कामगारांचा सिप्ला कंपनीत गुदमरुन मृत्यू झाल्याचा प्रकार गुरुवारी उघडकीस आला होता. त्यानंतर कंपनीतील कर्मचाऱ्यांनी समस्यांचा पाढा वाचण्यास सुरुवात केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Jantar Mantar Protest: ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याच्या मागणीने धरला जोर! NEET प्रकरणानंतर आता निवडणूक आयोगावर निशाणा; 10 ऑक्टोबरपासून 'जंतरमंतर 2.0' आंदोलनाची घोषणा

Goa Post Monsoon Rain Update: 107 वर्षांतील निचांकी मान्सूननंतर गोव्याला आता परतीच्या पावसाचीही हुलकावणी; मान्सूनोत्तर पाऊस 99 टक्क्यांनी घटला!

Goa Winter Tourism: गोव्यात हिवाळी पर्यटनाची दणक्यात सुरुवात! मॉस्कोहून 285 पर्यटकांसह दुसरे चार्टर विमान दाबोळीत दाखल

Andhra Pradesh Boiler Explosion: आंध्र प्रदेशातील कारखान्यात भीषण स्फोट; नावात साधर्म्य असल्याने गैरसमज, औषध कंपनीने मांडली आपली बाजू

Goa Politics: 'एक कचोरी, दोन समोसा, काँग्रेस आमदारांचा काय भरोसा?'; निवडणुकांआधी 'आप'चा काँग्रेसवर जोरदार घणाघात!

SCROLL FOR NEXT