House Collapsed  Dainik Gomantak
गोवा

Salcete: नुकसान भरपाईसाठी सासष्टीतून १३१ अर्ज

Government Compensation: नुकसान झालेल्‍या व्‍यक्‍तींना जिल्‍हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेकडून कमाल दोन लाख रुपयांपर्यंत मदत दिली जात आहे

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: मागचा महिनाभर पडत असलेल्‍या जोरदार पावसामुळे सासष्‍टी तालुक्‍यात मोठ्या प्रमाणावर पडझड झाली असून या तालुक्‍यातील सुमारे १३१ घरांची पडझड झाली आहे. या घरमालकांनी सरकारकडे नुकसानभरपाईसाठी अर्ज केले आहेत.

एका मडगावातच सहा ठिकाणी घरांची पडझड होण्‍याच्‍या घटना घडल्‍या असून पावसामुळे मातीच्‍या भिंती फुगल्‍याने चार घरांच्‍या भिंती कोसळल्‍या. तर दरड कोसळल्‍याने एका इमारतीतील सहा फ्‍लॅट्‌सची हानी झाली होती. त्‍याशिवाय भिंतीवर झाडे पडून घरांची मोडतोड होण्‍याच्‍याही घटना आहेत, असे नुकसान झालेल्‍या व्‍यक्‍तींना जिल्‍हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेकडून कमाल दोन लाख रुपयांपर्यंत मदत दिली जात आहे.

सासष्‍टी आपत्ती व्‍यवस्‍थापन यंत्रणेकडे सध्‍या सुमारे १३१ घरांच्या दुरुस्ती आणि नुकसान भरपाईसाठी अर्ज आले आहेत. यातील काही अर्ज मंजुरीसाठी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविले आहेत. सासष्‍टी मामलेदारांकडे मडगावसह, नावेली, कोलवा, असोळणा, नुवे, वेर्णा, गिरदोली, बाणावली आणि इतर गावांमधून घरदुरुस्तीचे अर्ज आले आहेत, अशी माहिती या विभागातील सूत्रांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

FDA Raid: गणेश चतुर्थीपूर्वी 'एफडीए'ची मोठी कारवाई! मडगाव, केपे, धारबांदोड्यात तब्बल 430 किलो अन्नसाठा नष्ट

8th Pay Commission: '68,000 किमान वेतन आणि जुनी पेन्शन हवीच!' चंदीगड बैठकीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांनी मांडल्या मोठ्या मागण्या; काय घेणार सरकार निर्णय?

Goa Police Reshuffle: गोवा पोलिस दलात मोठे फेरबदल! IPS अधिकाऱ्यांसह 12 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; दक्षिण गोवा एसपीपदी अक्षत आयुष

Mazi Bus Scheme: खासगी बसचालकांसाठी खुशखबर! 'माझी बस' योजनेत किलोमीटरमागे 5 रुपये अनुदान; जुन्या बस बदलण्यासाठी 10 लाखांपर्यंत मदत

Congo School Fire: कांगो हादरले! दोन शाळांमध्ये भीषण अग्निकांड, 26 विद्यार्थ्यांचा मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO समोर

SCROLL FOR NEXT