Army Recruitment Dainik Gomantak
गोवा

Army Recruitment: लष्करात भरती होण्याची सुवर्णसंधी! गोव्यातील बांबोळीत आर्मी भरतीचे आयोजन

Army Recruitment In Goa: भारतीय लष्करात भरती होण्याचं स्पप्न पाहत असणाऱ्या तरुणांसाठी नामी संधी आहे. आज प्रत्येकजण सरकारी नोकरी मिळवण्यासाठी धडपडत आहे.

Manish Jadhav

Army Recruitment: लष्कर भरतीसाठी तयारी करण्याऱ्या लाखो तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय लष्करात भरती होण्याचं स्पप्न पाहत असणाऱ्या तरुणांसाठी नामी संधी आहे. आज प्रत्येकजण सरकारी नोकरी मिळवण्यासाठी धडपडत आहे. मग ती नोकरी कोणत्याही प्रकारची असो. पण ही नोकरी जर थेट देशसेवेची संधी देणारी असेल तर होय, खरंय..

मागील काही महिन्यांपासून लष्कर भरतीची चातकासारखी वाट पाहणाऱ्या तरुणांची इच्छा आता पूर्ण होणार आहे. 24 जून ते 04 जुलै 2024 या कालावधीत गोव्यात लष्कर भरतीचे आयोजन करण्यात येत आहे. पात्र उमेदवार तात्काळ यासाठी अर्ज करु शकतात.

दरम्यान, गोव्यातील (Goa) बांबोळी येथील 3-TTR मैदानावर भरती मेळावा आयोजित करण्यात आला आहे. देशभरातील सर्व राज्यातील पात्र तरुण वरील नमूद केलेल्या कालावधीत अर्ज करुन भरती प्रक्रियेसाठी हजर राहू शकतात.

भारतीय सैन्य भरती रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन नोंदणी करावी लागेल. अधिसूचनेनुसार पात्र उमेदवार www.joinindianarmy.nic.in या वेबसाइटवर नोंदणी करु शकतात. वैध ईमेल आयडीद्वारे प्रवेश पात्र आहे. लष्करात भरती होण्याचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्यांसाठी ही खास संधी आहे. बिलकुल ही संधी सोडू नका...

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: मंगळ करणार 'त्रिगुणी संचार'!! सुरु होणार धन, सुख आणि समृद्धीचा प्रवाह; 3 राशींना मिळणार फायदा

Canacona: रायींमध्ये देवत्व लाभलेला, दूधसागरकडे जाताना लक्ष वेधून घेणारा 'मधुवृक्ष जर्माल'

Cluster University Goa: एकेकाळी 'गोवा युनिव्हर्सिटी'ला केंद्रीय दर्जा देण्याची चर्चा चालली होती; क्लस्टर विद्यापीठांची संकल्पना

Goa Live News: भाजप गोवा राज्य संघटनात्मक कार्यशाळेला म्हापसा येथे सुरुवात

Narve: नार्वेच्या पंचगंगेच्या तीरावर भरली ‘अष्टमीची’ जत्रा; भरपावसातही भक्तीचा उत्साह

SCROLL FOR NEXT